Home राजकारण काँग्रेसमध्ये पार्ट2? कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम’, थोरात-पटोले वादावर नवं ट्विट, हायकमांड काय निर्णय घेणार?

काँग्रेसमध्ये पार्ट2? कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम’, थोरात-पटोले वादावर नवं ट्विट, हायकमांड काय निर्णय घेणार?

283

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आता दोन गट पडल्याचं स्पष्टच झालंय. कारण काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी याबाबतचं ट्विट केलंय.

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आता दोन गट पडल्याचं स्पष्टच झालंय. कारण काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी याबाबतचं ट्विट केलंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात पक्षांतर्गत वाद सुरु असल्याचं स्पष्ट झालंय. त्यातून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचं चित्र आहे. पण थोरात आणि पटोलेंच्या वादामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण असल्याची माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे काँग्रेसच्या हेमलता पाटील यांनी स्वत: या वृत्ताला दुजोरा दिलाय. हेमलता पाटील यांनी ट्विट करत काँग्रेस कार्यकर्त्याच्या होत असलेल्या घालमेलीबद्दल माहिती दिलीय.

“बाळासाहेब थोरात यांचं पत्र वाचण्यात आलं. त्यांची मुलाखत बघितली. भाजपने शिवसेनेला गिळंकृत केलं. अशा पक्षाशी सामना करताना काँग्रेसमध्ये ही पार्ट 2 सुरु झालेलं आहे का? ज्या पद्धतीने हे सगळं वातावरण तयार झालेलं आहे त्या संदर्भात माझं ट्विट होतं”, अशी प्रतिक्रिया हेमलता पाटील यांनी दिली.