Home स्टोरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकास सावंत यांचे निधन.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकास सावंत यांचे निधन.

119

सावंतवाडी. दि- १५ जुलै (वार्ता): येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास भालचंद्र सावंत (वय ६२वर्षे) सकाळी १०.३० वाजता निधन झाले. सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. परंतु, तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले. सावंत हे माजी मंत्री कै. भाईसाहेब सावंत पांचे पुत्र होत त्यानी जिल्हा बैंक संचालक, राज्य सहकारी बैंक संचालक, जिल्हा परिषद सभापती म्हणून काम केले होते. त्यांच्या पश्चात मुलगा विक्रांत, नातू, भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे.