Home राजकारण काँग्रेसची कोकण विभागाची आढावा बैठक उत्साहात संपन्न.

काँग्रेसची कोकण विभागाची आढावा बैठक उत्साहात संपन्न.

130

उरण प्रतिनिधी: कोकण विभागाची आढावा बैठक नवी मुबंई मधील ऐरोली येथील लक्ष्मी नारायण म्हात्रे सभागृहात पार पडली यामध्ये नवी मुंबई शहर, पनवेल शहर, ठाणे शहर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड,पालघर, ठाणे ग्रामीण, भिवंडी शहर,उल्हासनगर शहर,कल्याण डोंबिवली शहर,मीरा भाईंदर,वसई विरार अश्या अनुक्रमे जिल्ह्यानिहाय आढावा बैठका घेण्यात आल्या. काँग्रेस पक्ष्याच्या सर्व फ्रंटल विभागाचे आणि 39 सेल चे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते नेते मोठया संख्येने उपस्थित होते.सर्व कार्यकर्तेच पक्षाची खरी ताकद आहेत सर्वांनी जनतेपर्यंत पोहचावे आणि राज्य व केंद्र सरकारच्या दडपशाही, महागाई ,बेरोजगारी ,जनतेसाठी काम करण्याची अनास्था या विरुद्ध जनतेचा आवाज या बहिऱ्या सरकार पर्यंत पोहचविण्या साठी आणि संघटनात्मक पक्षाची बांधणी करण्यासाठी या बैठकिंचा आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन व सूचना केल्या.तसेच कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक लागली असुन ही निवडणूक काँग्रेस पक्ष लढवणार आहे त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागावे मोठ्या संख्येने योग्य पद्धतीने पदवीधरांची नोंदणी करून घेऊन जास्तीत जास्त पदवीधर मतदार कसे वाढतील या कडे लक्ष देण्यास सांगितले आहे. यावेळी रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री महेंद्र घरत यांनी प्रदेश काँग्रेस कमिटीला सांगितले की रायगड जिल्ह्यातील प्रत्येक ब्लॉकमधून किमान 1000 मतदार नोंदवले जातील याची ग्वाही त्यांनी प्रदेश काँग्रेस कमिटीला दिली. याबद्दल नानाभाऊ पटोले यांनी त्यांचे विशेष कौतुक आणि अभिनंदन केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तसेच माजी मंत्री नसीम खान, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती संध्याताई सव्वालाखे , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष हुसेन दलवाईजी , रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रजी घरत,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रमोद मोरे ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस देवानंद पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे चिटणीस राजेश शर्मा,रायगड जिल्हा सहप्रभारी राणी अग्रवाल मॅडम, जिल्हा समन्वयक श्रीकृष्ण सांगळे,महाराष्ट्र प्रदेश फिशरमॅन अध्यक्ष मार्तंड नाखवा, प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत पाटील, प्रदेश चिटणीस प्रवीणदादा ठाकूर, महिला अध्यक्षा श्रद्धाताई ठाकूर रायगड वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, राजाभाऊ ठाकूर, प्रदेश प्रतिनिधी,जिल्ह्यातील सर्व ब्लॉक अध्यक्ष सर्व फ्रंटल चे अध्यक्ष उपस्थित होते.