Home स्टोरी कळसुलकर हायस्कूल मधील सार्जंट अनंत अभिजीत चिंचकर यास मुख्यमंत्री शिष्यवृत्ती प्रदान 

कळसुलकर हायस्कूल मधील सार्जंट अनंत अभिजीत चिंचकर यास मुख्यमंत्री शिष्यवृत्ती प्रदान 

102

कोल्हापूर: महाराष्ट्र राज्यातून माध्यमिक विभागातील केवळ १५ विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येणारी प्रतिष्ठेची महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री शिष्यवृत्ती कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेतील सार्जंट अनंत अनन्या अभिजीत चिंचकर याला प्राप्त झाली आहे.

या शिष्यवृत्तीचा धनादेश प्रधान सोहळा एनसीसी ग्रुप हेडकॉर्टर कोल्हापूर येथे नुकताच पार पडला, आणि राष्ट्रीय छात्र सेनेचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर राजकुमार किसन पैठणकर यांच्या हस्ते हा धनादेश वितरित करण्यात आला.

या उल्लेखनीय यशासाठी ५८ एनसीसी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अजय राज एल., अॅडमिनिस्ट्रेशन ऑफिसर लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक, तसेच विद्यालयाचे राष्ट्रीय छात्रसेना अधिकारी फर्स्ट ऑफिसर गोपाळ गवस यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या उत्तुंग यशाबद्दल अनंतचे सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री.शैलेश पई सर्व संचालक प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री सूर्यकांत भुरे सर त्याचप्रमाणे शिक्षक शिक्षकेतर वृंद यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.