सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी प्रशालेमध्ये भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष माननीय श्री विशाल प्रभाकर परब यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेशाचे वितरण करण्यात आले.
प्रशालेच्या व संस्थेचे अध्यक्ष श्री शैलेशजी पई यांच्या हस्ते श्री विशाल परब शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ,सन्मानचिन्ह व स्मरणिका देऊन स्वागत करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष श्री शैलेशजी पई यांनी संस्थेच्या व प्रशालेच्या कार्यभार विषयी आपले मनोगत व्यक्त केले मा.श्री विशालजी परब यांच्या कार्यकर्तृत्व व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. तर कळसुलकर हायस्कूल सारख्या शाळेसाठी गरज असेल त्यावेळी आपला पुढाकार असेल अशी ग्वाही मा.श्री विशालजी परब यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले, विद्यार्थ्यांबरोबर हितगुज साधत विद्यार्थ्यांना मिठाई देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब संस्थेचे अध्यक्ष श्री शैलेशजी पई, सदस्य श्री रवींद्र स्वार, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री दत्तप्रसाद गोठोसकर, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एस व्ही भुरे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप सावंत, प्रशालेचे लिपिक श्री वैभव केंकरे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी प्रशालेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी,पालक व प्रशालेचे हितचिंतक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अनिल ठाकुर यांनी केले तर आभार श्री धोंडी वरक यांनी मानले.