Home स्टोरी कळसुलकर प्राथमिक शाळेमध्ये पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न.

कळसुलकर प्राथमिक शाळेमध्ये पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न.

176

सावंतवाडी प्रतिनिधी: प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर येथील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा अर्थात कळसुलकर प्राथमिक शाळेच्या मुलांचा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम शाळेचा सभागृहामध्ये संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर सावंतवाडीतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व आराध्या सिनेमागृहाचे मालक श्री उदय पारळे, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री शैलेश पैई, संचालिका श्रीमती राजश्री टिपणीस,अँड.नम्रता नेवगी, कळसुलकर हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक श्री सूर्यकांत भुरे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप सावंत, पालक संघाच्या श्रीमती उमा बांदेकर शाळा व्यवस्थापन समितीच्या डॉ. रश्मी शुक्ल आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते वर्षभरात शालेय स्तरावर मुलांनी वेशभूषा स्पर्धा, भाषण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रंगभरन तसेच क्रीडा स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल मुलांचे मेडल, प्रशस्तीपत्रक व गुलाबपुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी बोलताना श्री पारळे यांनी शाळेचा वाढता आलेख असाच उंच उंच होत राहावा व या शाळेने संस्कारक्षम शिक्षण देत राहावे असे गौरवोद्गार काढले.

शाळेचे प्रार्थना सभागृह झाले डिजीटल..!

तत्पूर्वी प्राथमिक शाळेच्या प्रार्थना हॉलमध्ये पालक स्पर्धा सहभागातून, विद्यार्थ्यांच्या वाढदिवसानिमित्त मिळालेल्या देणगीतून व शिक्षकांच्या आर्थिक सहकार्यातून बीपीएल ४३” इंची टीव्ही बसवण्यात आला. याचे उद्घाटन श्रीमती काकतकर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री शैलेश पैई, सर्व संचालक, शाळा व्यवस्थापन समिती, पालक संघाचे व माता पालक संघाचे पदाधिकारी आणि विद्यार्थी सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री डी.जी. वरक यानी तर आभार प्रदर्शन श्री ए.जी. कांबळे यांनी केले.यावेळी मुख्याध्यापक सावंत, वरक सर, कांबळे सर, गुंजाळ मॅडम, बिले मॅडम, गावकर मॅडम, आडेलकर मॅडम, घाडीगावकर मॅडम आदी शिक्षक उपस्थित होते.