Home स्टोरी कळसुलकर प्राथमिक शाळेमध्ये सापांविषयी कार्यशाळेचे आयोजन.

कळसुलकर प्राथमिक शाळेमध्ये सापांविषयी कार्यशाळेचे आयोजन.

342

सावंतवाडी प्रतिनिधी: कळसुलकर प्राथमिक शाळा आणि स्पंदन समुपदेशन केंद्र, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सापांविषयी समज- गैरसमज या विषयावर कार्यशाळेचे आयोजन कळसुलकर प्राथमिक शाळेमध्ये करण्यात आले.

यावेळी इयत्ता दुसरी ते चौथीच्या मुलांना समाजात सापांविषयी जे समज किंवा गैरसमज आहेत, त्याविषयी इत्यंभूत माहिती सर्पमित्र श्री अनिल गावडे (कुडाळ) यांनी दिली. नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र साप हा शेतकऱ्याचा मित्र असून देखील त्याच्या विषयीचे समज- गैरसमज मुलांना लहान वयात समजले पाहिजेत. अशा प्रकारची भूमिका सर्पमित्र श्री गावडे यांनी मांडली. त्यांनी प्रोजेक्टरच्या साह्याने सापांच्या विविध जाती त्यामध्ये विषारी साप, निमविषारी व बिनविषारी साप असे सापांचे विविध प्रकार उदाहरणासह त्यांनी सांगितले.

साप चावल्यास काय करावे?                      सापाला मारू नये. सापांचे संगोपन झाले पाहिजे. सापांच्या प्रजाती टिकल्या पाहिजेत यासाठी मुलांमध्ये त्यांनी उद्बोधन केले. यावेळी मुलांनी त्यांना अनेक प्रश्न व शंका विचारल्या. व शंका समाधान करून घेतले. श्री गावडे यांना अनेक समाजसेवी संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले असून कुडाळ परिसरामध्ये कधीही कुणाचा सापाविषयी फोन आल्यास ते आवर्जून तिथे जाऊन साप पकडतात. व नैसर्गिक अधिवासात त्याला सोडून देतात.

यावेळी हा कार्यक्रम होण्यासाठी स्पंदन संस्थेच्या श्रीमती नम्रता नेवगी यांनी विशेष मेहनत घेतली. स्पंदन संस्थेच्या सचिव शिरोडकर मॅडम, शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप सावंत, शिक्षक श्री धोंडी गंगाराम वरक, अमित कांबळे, ज्योत्स्ना गुंजाळ, प्राची बिले, स्वरा राऊळ, संजना आडेलकर, स्मिता घाडीगावकर आदी शिक्षक उपस्थित होते.