सावंतवाडी प्रतिनिधी:
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंद केशवा भेटतोची…!.
सावंतवाडी येथील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा अर्थात कळसुलकर प्राथमिक शाळेतील मुलांना पांडुरंगाची आस लागल्याने या चिमुकल्या मुलांची कळसुलकर शाळा ते सावंतवाडीतील प्रसिद्ध संस्थानकालीन विठ्ठल मंदिर पर्यंत वारकरी दिंडी वाजत गाजत काढण्यात आली.मुलांनी विठ्ठल, रुक्मिणी, ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम, संत नामदेव, संत चोखामेळा, संत सावता,जनाबाई, मुक्ताबाई अशा विविध संतांच्या व्यक्तिरेखा साकारल्या. यावेळी मंदिर प्रशासनाकडून मुलांचे स्वागत करण्यात आले व मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची सुमारे 160 मुले वारीमध्ये सहभागी झाली. पांडुरंगाचा जयघोष करीत बाजारपेठेतून दिंडी विठ्ठल मंदिरामध्ये आल्यानंतर सर्व मुलांनी दर्शन घेतले व त्यानंतर विठ्ठलाचे अभंग, प्रार्थना तसेच मुलांनी रिंगण करून विविध कार्यक्रम सादर केले. ही शाळा आपल्या विविध उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. शालेय गुणवत्तेच्या सोबत मुलांना सांस्कृतिक कार्यक्रमांची ओळख वारी सारख्या उपक्रमातून करून दिली जाते.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप सावंत शिक्षक श्री डी.जी. वरक, श्री अमित कांबळे,श्रीमती ज्योत्स्ना गुंजाळ,श्रीमती प्राची बिले, श्रीमती स्वरा राऊळ,श्रीमती संजना आडेलकर श्रीमती स्मिता घाडीगावकर, श्रीमती पायशेट मॅडम, तसेच संस्थेचे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी,शिक्षक पालक संघ पदाधिकारी, माता पालक संघ पदाधिकारी, पालकवर्ग, विद्यार्थी, शाळेचे हितचिंतक उपस्थित होते.