सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी प्रशालेतील मुलांनी संस्कृत दिनानिमित्त विविध कार्यक्रम सादर केले.
यामध्ये कथा, श्लोक, स्तोत्र, गीतेचे अध्याय, नृत्य, गायन इत्यादी कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले.यावेळी संस्कृत भारतीतर्फे घेण्यात आलेल्या संस्कृतदेवावाणी प्रबोध परीक्षेचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आली.
या संस्कृत कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक श्री.एस.व्ही.भुरे, संस्कृत विभाग प्रमुख श्रीम.जी.एस.सावंत, संस्कृत शिक्षिका श्रीम.एम.एम.कदम, संस्कृत मंडळ अध्यक्ष कु.तेजस चंद्रोजी सावंत इत्यादी उपस्थित होते.तर या संस्कृत कार्यक्रमाला प्रशालेचे शिक्षक श्रीम.एस.जी.सामंत, श्री एस.एस. वराडकर, श्री पी.बी.बागुल, श्री निलेश धारगळकर, श्रीम.वैष्णवी सावंत यांनी उपस्थिती होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कृत विभाग प्रमुख श्रीम.जी.एस. सावंत यांनी केले तर सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील अनन्या गोरे व गगन लेले यांनी केले.तर इयत्ता दहावीतील भार्गवी कदम हिने आभार मानले.