Home स्टोरी कल्याण पूर्वेतील विज पुरवठा वारंवार खंडीत होण्याचे कारण आणि वास्तव स्थिती!_जनतेच्या माहिती...

कल्याण पूर्वेतील विज पुरवठा वारंवार खंडीत होण्याचे कारण आणि वास्तव स्थिती!_जनतेच्या माहिती साठी_

64

कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): काल मध्य रात्री पासुन ते या क्षणापर्यंत कल्याण पूर्वेत वारंवार विज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरीकांना भर उन्हाळ्यात उष्णतेचा चटका सहन करावा लागत आहे .
अचानक पणे उद्भभवलेल्या या प्रसंगाची वस्तूची अशी आहे.
नेतीवली सर्कल जवळ रस्त्याच्या कडेला जमिनी खाली असलेल्या विज वितरण कंपनीच्या इन कमींग केबल रस्त्याच्या डांबरी करणावेळी अनेक ठिकाणी डॅमेज झाल्याची शक्यता आहे . तेव्हा पासुन आज पर्यंत त्या डॅमेजचा सुगावाही लागला नाही . परंतु याच केबलच्या काही अंतरावर असलेली जल वाहीनी लिकेज झाल्याने हे लिकेज झालेले पाणी डॅमेज केबल मध्ये शिरल्याने विज पुरवठा खंडीत होण्यास सुरुवात झाली . हा सर्व प्रकार भूगर्भात झाल्याने आणि रस्त्याच्या वरचा भाग कोरडा असल्याने नक्की केबल कुठे डॅमज झाली हे शोधण्यात बराच वेळ गेल्या नंतर सुमारे ५० मिटर केबल कट करून त्या ठिकाणी दुसरी नवीन केबल टाकावी लागली . ( डॅमेज केबल च्या आत काळ्या कव्हर मध्ये पूर्ण पाणी भरलेले आढळून आले) ही केबल वजनाने जड आणि जड हाताळण्यास अवघड असल्याने या कामासाठी दोन ठेकेदारांच्या सुमारे ५० कर्मचारी रात्री पासुन आत्ता पर्यंत हे काम तडीस नेण्यासाठी मेहनत करीत आहेत .
याच दरम्यान पर्यायी व्यवस्था म्हणून विभागवार अन्य केबल वरून तासा दोन तासाचा विज पुरवठा चालु ठेवण्याचा कंपनी कडून प्रयत्न होत आहे .

सध्या हे काम अंतिम टप्यात असून काही वेळत हे काम पुर्ण होउन आजची रात्र विज पुरवठा पूर्ण क्षमतेने सुरु राहिल असा विश्वास विज वितरण कंपनीच्या एका जबाबदार अधिकार्‍याने व्यक्त केला आहे .