युतीत कसलाही बेबनाव नसल्याची खा श्रीकांत शिंदे यांनी दिली ग्वाही!
कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): काही दिवसांपूर्वीच कल्याण पूर्वेत भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना कसल्याही प्रकारचे सहकार्य केले जाणार नसल्याचा ठराव मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पारीत करण्यात आला होता, याच पार्श्वभूमीवर त्या मेळाव्या नंतर लोकग्राम पुलाच्या भूमिपूजन सोहळ्या निमित्त खासदार डॉ. श्रीकांत शिंदे प्रथमच कल्याण पूर्वेत आले होते . या भूमिपूजन सोहळ्यात खासदार डॉ .श्रीकांत शिंदे यांनी सेना भाजप मध्ये कसल्याही प्रकारचा बनाव नसल्याचे स्पष्ट करीत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्रीत काम करत असल्याची ग्वाही दिली .राज्य आणि रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून सुमारे ७८ कोटी निधीतुन कल्याण पूर्व पश्चिमेला जोडणारा पादचारी पुलाची निर्मिती होत आहे . या पुलाच्या भूमिपूजनासाठी खासदार डॉ श्रीकांत शिंदें कल्याण पूर्वेत आले होते . प्रभाग ४ जे कार्यालयाच्या प्रांगणात या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, या समयी व्यासपीठावर कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ . भाऊसाहेब धांगडे, भाजपा आमदार गणपत गायकवाड, सेनेचे माजी नगरसेक आणि शहर प्रमुख महेश गायकवाड, माजी नगरसेवक निलेश शिंदे, विशाल पावशे, प्रशांत काळे, दिपेश म्हात्रे, नवीन गवळी, मल्लेश शेट्टी, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे भाजपाचे माजी नगरसेवक मनोज राय, अभिमन्यू गायकवाड, पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे, सुभाष म्हस्के, संदिप तांबे आदी सेना भाजपचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच पत्रकारांना या व्यासपीठावर वेगळे काही मिळणार नाही या वाक्क्याने करतांना सांगितले की, विरोधककांनी कितीही वावड्या उठवल्या तरीही कार्यकत्यांच्या शुल्कक मतभेदामुळे आमची युती तुटणार नाही युतीच्या माध्यमातून राज्यात गेल्या ११ महिन्यात विकास कामांचा धडाका चालु आहे . या कामात कितीही मिठाचा खडा टाकण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला तरीही त्यात त्यांना यश येणार नाही . कल्याण पूर्वेत युतीच्या माध्यमातून अनेक विकास कामे सुरु आहेत, यु टाईप रस्त्याचेहि काम लवकरच सुरु करण्यात येईल तसेच डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे कामही वेगात सुरु असल्याचे त्यांनी सांगितले .आमदार गणपत गायकवाड यांनीही सेना भाजप मधील युती अभेद्य असल्याचे स्पष्ट करतांना सांगितले की गेल्या अनेक वर्षात माझा निधी येऊनही तो अनेक वेळा परत जात होता परंतु राज्यात शिदे – फडणवीस सरकार अस्तित्वात आल्याने माझ्या विकास निधीचाही पुरेपुर उपयोग होत आहे . आगामी निवडणूकांमध्ये जागा वाटपात कसल्याही प्रकारे अडथळा होणार नाही, मंत्री रविंद्र चव्हाण कार्यक्रमाला उपस्थित नसले तरीही यांच्याच मार्गदर्शनाखाली आजचा कार्यक्रम संपन्न झाल्याचा दावा आमदार गणपत गायकवाड यांनी पत्रकाराच्या एका प्रश्नाला उत्तर देतांना केला .सुमारे ७८ कोटी निधी वापरातून सुरु करण्यात आलेल्या या पुलाचे काम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होणार असल्याने खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी सांगीतले .कार्यक्रमाची सांगता झाल्या नंतर प्रेक्षकांमधून श्रीकांत शिंदे अगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देण्यात आल्या . कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश शिंदे यांनी केले तर सुत्र संचलन दळवी सर यांनी केले .