कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड): – कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते, ह. भ. प. वसंतराव सुर्यवंशी यांचे पुतणे आणि बालपणा पासुनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत सेवक नरेंद्र तथा नाना सुर्यवंशी यांची कल्याण डोंबिवली भाजपा जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे. शालेय जिवना पासुनच समाजकार्याची ओढ असलेले नरेंद्र सुर्यवंशी यांनी आपल्या राजकीय जिवनाची सुरुवात वयाच्या १८ व्या वर्षी करून त्यांनी राजकारणाचे धडे वसंतराव सुर्यवंशी तसेच माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांचे कडून घेतले. नरेंद्र सुर्यवंशी हे सन १९९५ पासुन भाजपा पक्षाच्या विविध पदावर कार्यरत राहून त्यांनी आजपर्यंत पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
नरेंद्र सुर्यवंशी यांनी भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष, कल्याण जिल्हा उपाध्यक्ष, ठाणे विभाग सचिव, या संघटनात्मक जबाबदार्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत . त्यांच्या या कार्याची दखल घेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची कल्याण जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली आहे. राजकीय पदा बरोबरच नरेंद्र सुर्यवंशी हे कल्याण पूर्वेतील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे विश्वस्त असून त्यांनी जरीमरी सेवा मंडळाचे सचिव, दि ईस्ट कल्याण वेलफेअर सोसायटी संचालित मॉडेल इंग्लिश हायस्कुल, ज्युनिअर व सिनिअर चे खजिनदार, महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा ठाणे विभागाचे सचिव या व अशाच अन्य विविध संस्था संघटनांच्या महत्वाचा पदावार कार्यरत राहून आपल्या कतृत्वाची छाप पाडली आहे. नरेंद्र सुर्यवंशी यांच्या या नियुक्ती मुळे त्यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच सामांन्य जनांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.