कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड): – गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या कल्याण पूर्वेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम निव्र गतीने होत असून हे स्मारक पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रभाग ड कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या डाँ . बाबासाहेब आंबेडकर जयंती अभिवादन कार्यक्रमात उपस्थितांना संबोधीत करतांना केले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव – कल्याण पूर्व यांच्या विद्यमाने पूर्वेतील प्रभाग ड कार्यालयाच्या प्रांगणात या अभिवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या समयी खा. शिंदे पुढे म्हणाले की, आजचा दिवस हा पूर्वेतील आंबेडकरी जनतेसाठी अत्यंत आनंदाचा आणि महत्वाचा आहे कारण आंबेडकर स्मारकाचे स्वप्न पूर्णत्वात उतरत आहे, या स्मारकातून डॉ बाबासाबांच्या कतृत्वाची प्रेरणा पुढील पिढ्यांना मिळणार आहे. पुढील वर्षी नव निर्मित स्मारकात भव्य दिव्य स्वरुपात जयंती उत्सव साजरा केला जाईल असेही त्यांनी सांगितले. स्मारक निर्मितीतीत आमदार गणपत गायकवाड आणि येथील जनतेचाही तितकाच वाटा आहे, स्मारकाच्या निर्मिती साठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्या सर्वांचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आभार मानले.
यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी आपल्या भाषणात सांगितले की, स्मारकाच्या निर्मितीसाठी सर्वांना सोईची अशी मीच जागेची निवड केली हाती, आणि जागेचा प्रश्न सुटला नसता तर स्मारक निर्मिती झाली नसती म्हणून जागेसह अन्य ज्यांनी ज्यांनी स्मारक निर्मितीची मागणी केली आणि हातभार लावला त्या सर्वांचे आभार मानलेच लागतील. आमदार, खासदार यांच्या प्रयत्नाने आणि भिमसैनिकांच्या रेट्याने उभे रहात असलेले स्मारक हे कल्याण नगरीचे भूषण असून या स्मारकाला भविष्यात पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त होईल असा विश्वास सिंधूताई मेश्राम यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.
आंबेडकर जयंती उत्सव समितिच्या अध्यक्षा आयु सिंधुताई मेश्राम यांच्या अध्यक्षते खाली आयोजित करण्यात आलेल्या अभिवाद कार्यक्रमात बुद्ध भिम गितांच्या कार्यक्रमा नंतर रात्री ११ . ४५ ते ०० वाजे पर्यंत पंचशील – धम्म वंदना घेण्यात आली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास सर्वात प्रथम खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून महामानवास अभिवाद केले. त्या नंतर आमदार गणपत, नांदेडचे खासदार हेमंत पाटील, जळगांवचे खासदार उन्मेश पाटील, विद्यमान अध्यक्षा सिंधुताई मेश्राम, अण्णा रोकडे, देवचंद अंबादे, ललिता आखाडे, सुवर्णाताई गायकवाड, माधुरी काळे, महेश गायकवाड, मिलींद बेळमकर, अमित सोनवणे, सुबोध भारत, भारत सोनवणे, प्रशांत काळे, मनोज राय, संजय शिर्के, अशोक भोसले, विवेक जगताप, सुमेध हुमणे, सहाय्यक पो. आ. उमेश माने पाटील, संजय राक्षसकर , व. पो. नि. महेंद्र देशमुख यांचेसह हजारो भिम सैनिक, उपासक, उपासिका यांनी महामानवाला वंदन केले.
स्मारक निर्मितीच्या पार्श्वभूमिवर या वर्षी अभिवाद कार्यक्रमास भिमसागर उसळल्याचे चित्र दिसून आले.