Home स्टोरी कल्याण डोंबिवली महापालिकेतही खाते बदल!

कल्याण डोंबिवली महापालिकेतही खाते बदल!

162

संजय जाधव यांचे कडील महापालिका सचिवपदाची जबाबदारी उपायुक्त धैर्यशिल जाधव यांचे सुपूर्त!

कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): महाराष्ट्राच्या सत्ताधार्‍यांमध्ये नुकतेच खाते वाटपासह खाते बदल झाले असतांनाच आता कल्याण डोंबिवली महापालिकेतही पदांची अदला बदल आणि बदल्यांचा सिलसिला चालु होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. याचाच एक भाग म्हणून दोनच दिवसांपूर्वी अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त सुधाकर जगताप यांची कल्याण डोंबिवली महापालिकेतून अन्य ठिकाणी बदली झाल्याचा प्रकार ताजा असतांनाच सोमवारी पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी संजय जाधव यांचे कडे असलेला ‘महापालिका सचिव’ पदाचा असलेला अतिरिक्त कारभार अचानकपणे काढून घेऊन तो परिमंडळ १ चे उपायुक्त धैर्यशील जाधव यांचे कडे सुपूर्त केला आहे .या आदेशान्वये आता धैर्यशिल जाधव यांचे कडे परिमंडळ १ च्या उपायुक्त पदा बरोबरच ‘ पालिका सचिव हे दुसऱ्या क्रमांकाचे महत्वाचे पद रहाणार असून संजय जाधव यांना पूर्ववत मुळ मुख्य उद्यान अधिक्षक पदाचा पूर्ववेळ कार्यभार सांभाळावयाचा आहे.