सावंतवाडी प्रतिनिधी: कलबिस्त हायस्कूलमध्ये पाच दिवसाचे योग शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये योगाभ्यास त्याचबरोबर मानसिक ताण तणाव कमी करणे आधी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. समारोप प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य रमेश सावंत यांनी स्पष्ट केले की, खरंतर आज योगा अभ्यास फार महत्त्वाचा आहे. योगामुळे माणसाचे मन आणि आरोग्य उत्तम राहते. त्यामुळे हे शिबीर निश्चितच तुम्हाला फलदायी आहे. असे स्पष्ट केले. यावेळी सरपंच सपना सावंत यांनीही शुभेच्छा दिल्या. मुंबई विद्यापीठाच्या सावंतवाडी शाखेतील विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.
या पाच दिवसाच्या शिबिरात, राजन राणे, लक्ष्मण राणे, चंद्रशेखर नाईक, रवींद्र प्रभुदेसाई, नारायण राणे यांनी खूप चांगल्या पद्धतीने योग अभ्यास घेतला. त्यांचे विद्यापीठ तर्फे आभार मानले.