Home स्टोरी कलंबिस्त हायस्कूलच्या १९९७-९८ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न…!

कलंबिस्त हायस्कूलच्या १९९७-९८ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न…!

277

सावंतवाडी: आपल्या शालेय जीवनातील रम्य व सुखद स्मृतींना उजाळा देत,शाळा व गुरुजनांप्रती आदर व आस्था व्यक्त करीत तब्बल २५ वर्षांनी एकत्र आलेल्या १९९७-९८ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा कलंबिस्त हायस्कूलमध्ये भावपूर्ण व उत्साहाने भारलेल्या वातावरणात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे माजी मुख्याध्यापक श्री. सिताराम सुर्वे, श्री. विजयकुमार पाटील, माजी शिक्षक व संस्थेचे विद्यमान संचालक श्री. शिशकांत धोंड, माजी शिक्षकेतर कर्मचारी रामचंद्र सावंत, मधुकर नाईक, मधुकर कदम प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव, प्रशालेचे सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. या उपस्थित मान्यवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन या स्नेहमेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. दिवंगत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची आठवण करीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. सर्व उपस्थित आजी-माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या बॅचमधील विद्यार्थ्यांच्या हस्ते कृतज्ञतेचे व स्नेहाचे प्रतीक म्हणून भेटवस्तू देऊन सन्मान व आपल्या शालेय जीवनातील रम्य व सुखद स्मृतींना उजाळा देत,शाळा व गुरुजनांप्रती आदर व आस्था व्यक्त करीत तब्बल २५ वर्षांनी एकत्र आलेल्या १९९७-९८ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा कलंबिस्त हायस्कूलमध्ये भावपूर्ण व उत्साहाने भारलेल्या वातावरणात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे माजी मुख्याध्यापक श्री. सिताराम सुर्वे, श्री. विजयकुमार पाटील, माजी शिक्षक व संस्थेचे विद्यमान संचालक श्री. शिशकांत धोंड, माजी शिक्षकेतर कर्मचारी रामचंद्र सावंत, मधुकर नाईक, मधुकर कदम प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव, प्रशालेचे सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. या उपस्थित मान्यवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन या स्नेहमेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. दिवंगत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची आठवण करीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. सर्व उपस्थित आजी-माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या बॅचमधील विद्यार्थ्यांच्या हस्ते कृतज्ञतेचे व स्नेहाचे प्रतीक म्हणून भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.