सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त -शिरशिंगे – शिवापूर रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या कामाचे शुभारंभ माजी उपनगरच्या राजन पोकळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, माजी जि.प. सदस्य रवी मडगांवकर, माजी जि.प. सदस्य पंढरी राऊळ, उपतालुकाप्रमुख जीवन लाड, पंढरी पुनाजी राऊळ, उपतालुका प्रमुख गजानन नाटेकर, विभागप्रमुख विनायक सावंत, शिवसेना संघटक पंढरी राऊळ, उपसरपंच मोहन राऊळ, सांगेली उपसरपंच संतोष नार्वेकर, प्रल्हाद तावडे, विजय कदम, अनिल सौदेकर, प्रसाद गावडे, सदा कदम, गणू सावंत, सुनील सावंत, संजय पालकर, उदय सावंत, सौ सेजर लाड, अवधूत नार्वेकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
धावडकी ते सांगेली या दोन किमी रस्त्याचे रुंदीकरणाचे काम पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात आले आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून हे काम मंजूर झाले होते. दुसऱ्या टप्प्यात सांगेली ते कलंबिस्त या टप्प्याचे काम घेण्यात येणार असल्याचे श्री पोकळे यांनी स्पष्ट केले.