सावंतवाडी प्रतिनिधी: सह्याद्री पट्ट्यातील कलंबिस्त. शिरशिंगे असा मार्ग पूर्णपणे जलमय झाला आहे. पडत असलेल्या धुवाधार पावसामुळे येथील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. या भागात शिरशिंगे कलंबिस्त भागात सर्वत्र पाणी झाले आहे. हा सह्याद्री मार्ग सध्या जलमय स्थितीत आहे. काही भागात रस्त्यावर पाणी साचले आहे. या भागात हा एकमेव मार्ग आहे. या राज्यमार्गाच्या साईड नेच तेरेखोल नदी प्रवाह आहे. असे असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने या राज्य मार्गाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. काही भागात गटारे नाहीत. त्यामुळे संपूर्ण पाणी रस्त्यावर साचून रस्ते जलमय होत आहेत आणि सदर मार्ग चिखलमय झाल्यामुळे अपघाताला निमंत्रण ठरत आहेत. गेल्या सात-आठ महिन्याभरापूर्वीच हा मार्ग डांबरीकरण खडीकरण व दुरुस्ती करण करण्यात आला होता. त्यावर करोडो रुपये खर्च घालण्यात आले मात्र पहिल्याच पावसात या मार्गावर सर्वत्र जलमय स्थिती आहे. सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तावडे यांनी यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एकंदरीत कारभाराबाबत ताशेरे ओढले आहेत. कलंबिस्त श्री लिंगेश्वर मंदिर पासून ते मळा पर्यंत सर्व मार्ग जलमय होत आहे. त्याला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत.







