Home स्टोरी कलंबिस्त येथे महाशिवरात्री निमित्त दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन.

कलंबिस्त येथे महाशिवरात्री निमित्त दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन.

67

सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त येथे महाशिवरात्री निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमान दशावतार नाट्य मंडळ व कलंबिस्त ग्रामस्थ श्री लिंगेश्वर मंदिर देवस्थान गावकरी मंडळीच्या वतीने माजी शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांच्या सहकार्याने आज २२ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत दशावतार नाट्य महोत्सव सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत कलंबिस्त लिंगेश्वर मंदिर येथे होणार आहे. जिल्ह्यातील नामवंत दशावतार नाट्य मंडळाची नाटके होणार आहेत. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन हनुमान दशावतार नाट्य मंडळ व ज्येष्ठ ग्रामस्थ रमेश सावंत यांनी केले आहे .