Home स्टोरी कलंबिस्त येथे भाषा पंधरावडा संवर्धन दिन उत्साहात साजरा…!

कलंबिस्त येथे भाषा पंधरावडा संवर्धन दिन उत्साहात साजरा…!

167

सावंतवाडी प्रतिनिधी: मराठी भाषा पंधरावडा संवर्धन दिनानिमित्त कलंबिस्त प्राथमिक शाळा नंबर १ मध्ये कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालय व कला क्रीडा मंडळ तर्फे घेण्यात आलेल्या हस्ताक्षर सुधार स्पर्धेत विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. यावेळी मराठी भाषा पंधरावडा संवर्धन दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते व कलंबिस्त हायस्कूलचे आजी-माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष बाळा राजगे, सामाजिक कार्यकर्ते सखाराम उर्फ बाबू सावंत, ज्ञानमंदिर वाचनाचे माजी सचिव जिल्हा ग्रंथालयाचे संचालक अध्यक्ष एडवोकेट संतोष सावंत, माजी अध्यक्ष रूपा सावंत,  उपाध्यक्ष रमेश सावंत, मुख्याध्यापक संजय शेडगे, शिक्षक श्री पावसकर, ग्रंथपाल श्रीमती जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम आर्या सावंत, द्वितीय तनिष्का जाधव, तृतीय काव्य तावडे, आदित्य पावस्कर यांना प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री राजगे म्हणाले की, मी शालेय जीवनात असताना नाटक आणि कविता लिहिल्या होत्या. लहानपणापासूनच आपले हात लिहिते व्हायला हवेत. विद्यार्थ्यांनी मराठी भाषा संवर्धनासाठी लिहिते व्हा. असे आव्हान केले. यावेळी जिल्हा ग्रंथालयाचे संचालक एडवोकेट सावंत म्हणाले की, मराठी भाषा ही आपल्या घरातून शिकायला हवी. आपण शुद्ध आणि स्पष्ट मराठी भाषेत बोलायला हवे. मराठी भाषा ही जेवढी चांगली लिहिता वाचता येईल तेवढी ती सुंदर भाषा आहे जपणूक करा. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने ठेवायला हवी. यावेळी सूत्रसंचालन मुख्याध्यापक शेडगे तर प्रास्ताविक रूपा सावंत यांनी केले. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते.

फोटो: सावंतवाडी ज्ञानमंदिर वाचनालय तर्फे मराठी भाषा पंधरवडा संवर्धन निमित्ताने हस्ताक्षर स्पर्धेत विजेते पारितोषिक वितरण करताना बाळा राजगे, एडवोकेट संतोष सावंत, रूपा सावंत, रमेश सावंत आधी.