Home स्टोरी कलंबिस्त येथे ब्रँड अँबेसेडर हे नाटक सादर होणार.

कलंबिस्त येथे ब्रँड अँबेसेडर हे नाटक सादर होणार.

284

सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त येथे मंगळवारी दि. १२ मार्च रोजी सायंकाळी आठ वाजता कलंबिस्त हायस्कूल च्या पठांगणावर कॉमेडी नवा ब्रँड अँबेसेडर हे नाटक सादर होणार आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून शिवसेना पक्षाच्या वतीने व दीपक केसरकर मित्र मंडळ पंचक्रोशी यांच्या सौजन्याने हे नाटक होत आहे. अभिनेता दिगंबर नाईक यांचे हे आजोळ,  या आजोळच्या ठिकाणी प्रथमच नाट्य अभिनेता दिगंबर नाईक या भागात त्याचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून सह्याद्री पट्ट्यात सांस्कृतिक उपक्रमांना अधिक चालना मिळावे या हेतूने हे नाट्य व सिनेमा अभिनेते यांचे भव्य दिव्य नाटक सादर करण्यात येत आहे.

या कार्यक्रमाला दीपक केसरकर मित्रमंडळाचे अध्यक्ष राजन पोकळे, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, गजानन नाटेकर, शिवसेना विभाग प्रमुख विनायक सावंत, शिवसेनेचे कलंबिस्त भागातील पदाधिकारी संजय पालकर, जीवन लाड, पंढरी पुनाजी राऊळ आधी उपस्थित राहणार आहेत.

तरी सर्वांनी या दशक्रोशीतील नाट्य रसिक व नागरिकांनी मोठ्या संख्येने या नाट्यप्रयोगास उपस्थित रहावे. असे आवाहन करण्यात आले आहे.