Home स्टोरी कलंबिस्त येथे जिल्हास्तरीय कृषी व पशुसंवर्धन दुग्ध विकास जिल्हास्तरीय शेतकरी संवाद मेळाव्याचे...

कलंबिस्त येथे जिल्हास्तरीय कृषी व पशुसंवर्धन दुग्ध विकास जिल्हास्तरीय शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन

307

सावंतवाडी प्रतिनिधी: कृषी व पशुसंवर्धन खात्यामध्ये आता पारदर्शकता आली आहे. त्यामुळे शासनाच्या विविध योजना आहेत. त्याचा लाभ शेतकरी व दूध शेतकरी उत्पादकांनी घ्यावा. सन २०२३ हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून केंद्र सरकारने जाहीर केले आहे. या माध्यमातून आपण शेतकरी हा उद्योजक कसा बनेल? यासाठी शेतकऱ्यांनी आता स्वतःला बदलायला हवे. शेती, दूध व्यवसायाकडे बिजनेस म्हणून पहा आणि चौकस होऊन शेती व दूध व्यवसायाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. असे मत जिल्हा कृषी अधीक्षक डी. एस. दिवेकर यांनी व्यक्त केले. कलंबिस्त ग्रामपंचायत येथे कलंबिस्त ग्राम पंचायत व कलंबिस्त पंचक्रोशी दुग्ध व्यवसायिक संस्था मर्यादित कलंबिस्त व श्री देवी पावणाई रवळनाथ फार्मर प्रोडूसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कृषी व पशुसंवर्धन दुग्ध विकास यासंदर्भात जिल्हास्तरीय शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता.

दीप प्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन करतांना जिल्हा कृषी अधीक्षक श्री दिवेकर

या मेळाव्याचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून श्री दिवेकर यांनी केले. यावेळी व्यासपीठावर नाबार्डचे अधिकारी अजय थुटे, कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी अजित अडसूळ, तालुका कृषी अधिकारी प्रमोद बनकर, सरपंच सपना सावंत, उपसरपंच सुरेश पास्ते, सहकार विकास महामंडळाचे संतोष चाळके, स्मार्ट चे मॉडल अधिकारी रामचंद्र सातार्डेकर, लक्ष्मण खुरकुटे, जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र मडगावकर, दुग्ध संस्थेचे चेअरमन ॲड संतोष सावंत, फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक प्रमोद नाईक, दुग्ध संस्थेचे सचिव रमेश सावंत, प्रगतशील शेतकरी लक्ष्मण राऊळ, गोकुळचे दूध संकलन अधिकारी अनिल शिखरे, विस्तार अधिकारी भगवंत गावडे, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक उपायुक्त अजित मळीक, जिल्हा बँकेचे शाखाधिकारी श्री आरोसकर व प्रमोद कदम, ग्रामपंचायत सदस्य दीपक जाधव, दूध संस्थेचे संचालक दत्ताराम कदम, शिवसेना शाखाप्रमुख दिनेश सावंत, कुसाजी सावंत, श्याम राऊळ  अशोक राऊळ, गजानन राऊळ, गुरु राऊळ, बाळा राजगे, जीवन लाड, प्रशांत देसाई, श्री धोंड,  ग्रामसेवक बाळासाहेब फुंदे, कृषी सहाय्यक छाया राऊळ, अनमोल गावडे, रेशमा तुळसकर, अक्षय खराडे, श्री साखरे, मीनल जंगम, मंदार जंगम, सिद्धेश सावंत, स्वप्निल सावंत आणि राजू बिडये उपस्थित होते.

श्री दिवेकर यांचे शाल व श्रीफळ देऊन सरपंच सावंत यांच्या हस्ते सत्कार करतांना सरपंच सावंत

यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक श्री दिवेकर यांचे शाल व श्रीफळ देऊन सरपंच सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना श्री दिवेकर पुढे म्हणाले योग्य वेळी असा शेतकरी व दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थित मेळावा घेतला. हे अत्यंत चांगले आहे. खरंतर केंद्र व राज्य सरकारच्या एवढ्या कृषी व पशुसंवर्धन तसेच पाणी सिंचन आदी बाबत योजना आहेत. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यायला हवा. शेतकऱ्यांनी आता स्वतःला बदलायला शिकायला हवे. शेतीकडे फावल्या वेळेत ला काम म्हणून न पाहता त्याकडे बिझनेस म्हणून पाहायला हवे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न योजनेच्या माध्यमातून आज विविध शेतकऱ्यांसाठी उत्पन्न वाढीच्या योजना आहेत. त्याचा लाभही घ्यायला हवा.

कृषि मेळाव्यात सहभागी शेतकरी

कृषी विभागामध्ये आता सॉफ्टवेअर आहे. त्यामुळे ३६५ ही दिवस तुम्ही वीस योजनांसाठी एकाच वेळी अर्ज करू शकता .आणि त्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे हमखास तुमच्या अर्जाला तुम्हाला हव्या त्या योजनेचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे पारदर्शकता आली आहे. शेतकऱ्यांनी चौकस होऊन या शेती व दूध व्यवसायाकडे पाहिले पाहिजे. सिंधू रत्न योजनेमध्ये विविध गटांसाठी योजना आहेत. त्याचाही लाभ घ्या. या योजनेला मुदत वाढही मिळणार आहे. निश्चितपणे या गावात लवकरच शेतकऱ्यांच्या विविध योजनांसाठीचे अर्ज प्रक्रिया भरण्यासाठी आपण सर्व टीम येऊ. अशे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी नाबार्ड अधिकारी श्री थट्टे यांनी नाबार्डच्या योजना आणि सबसिडीच्या मागे न धावता शेती व पशुसंवर्धन हा उद्योग व्यवसाय म्हणून त्याकडे पहा आणि स्वतः बदलायला शिका आणि बँकांच्या माध्यमातून मिळणाऱ्या कर्जाच्या माध्यमातून तुम्ही शेतीपूरक व्यवसायाकडे लक्ष द्या आणि उद्योजक बना. सबसिडीच्या माध्यमातून आपल्याला  फ्री मनी कशी मिळेल? याकडे न पाहता शेती व शेतीला पूरक असलेला दूध व्यवसाय याकडे बिझनेस म्हणून लक्ष द्या.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बारमाही कलिंगणाचे पीक आता घेतले जात आहे. यातून ५० लाख टन एवढे कळींगणाचे पीक आता मिळत आहे. हा एक व्यवसाय झाला आहे. त्या पद्धतीने आता तरुणांनी आपण शिक्षणामध्ये मास्टर आहोत म्हणून गप्प न बसता शिक्षणापेक्षा एखाद्या व्यवसायाकडे किंवा शेतीकडे बिझनेस म्हणून पहा. असे स्पष्ट केले. यावेळी पशुसंवर्धन बाबत डॉक्टर अजित मळीक व गोकुळचे अनिल शिखरे यांनी दूध उत्पन्न वाढीच्यासाठी अनेक शासनाच्या योजना आहेत.

तसेच दुधाळ गाई म्हशी यासाठी केंद्र व राज्य सरकार तसेच विविध बँकांच्या माध्यमातून कर्जपुरवठा होत आहे. त्यातून दूध उद्योजक कसे बनता येईल? याकडे लक्ष द्या आणि गटागटाणे दूध, शेती प्रकल्प कसे राबवता येतील? याबाबतचे मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र मडगावकर, स्मार्ट चे रामचंद्र सातार्डेकर, लक्ष्मण खुरकुटे, संतोष चाळके जिल्हा बँकेचे प्रमोद कदम आदींनी शासनाच्या कृषी पशुसंवर्धन सहकार नाबार्ड स्मार्ट योजना व बँकाकडून मिळणाऱ्या योजना याबाबत माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी प्रमोद बनकर यांनी कृषी विभागामार्फत विविध योजना व यंदाचे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून गणले जात आहे. त्यातून नाचणे व बाजरी याकडे लक्ष द्या असे स्पष्ट केले. तर सरपंच सौ सावंत यांनी हा कृषी व पशुसंवर्धन दुध व्यवसायिकांचा मेळावा गावातील शेतकऱ्यांसाठी फलदायी ठरेल. असे स्पष्ट केले. यावेळी गोकुळचे दुधचे संकलन अधिकारी अनिल शिखरे यांचा शाल व श्रीफळ देऊन संस्थेचे सचिव रमेश सावंत व दिनेश सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर शेतकरी अशोक राऊळ यांचाही सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन ॲड सावंत तर आभार प्रोडूसर कंपनीचे सीईओ हेमंत गावडे यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

फोटो सावंतवाडी कलंबिस्त ग्रामपंचायत व कलंबीस्ता पंचक्रोशी दूध व्यावसायिक मर्यादित संस्था व श्रीदेवी रवळनाथ फार्मर प्रोडूसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कृषी व दूध पशुसंवर्धन शेतकरी संवाद मिळाव्यात बोलताना जिल्हा कृषी अधीक्षक डीएस दिवेकर, बाजूला नाबार्डचे अजय थुटे, सरपंच सपना सावंत, रवींद्र मडगावकर, अजित अडसूळ, लक्ष्मण खुरकुटे, डॉक्टर अजित मळीक, रामचंद्र सातार्डेकर, प्रमोद बनकर, ॲड संतोष सावंत, सुरेश पास्ते प्रमोद नाईक आधी