Home स्टोरी कलंबिस्त येथे आयोजित सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला उस्फुर्त प्रतिसाद….!

कलंबिस्त येथे आयोजित सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला उस्फुर्त प्रतिसाद….!

240

सावंतवाडी प्रतिनिधी: ग्रामीण भागात सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आणि ते सह्याद्री पट्ट्यातील कलंबिस्त भागात भरवले गेले आणि उत्तम रित्या हे विज्ञान प्रदर्शन भरवले गेले हे खरंच कौतुकास्पद आहे. कलंबिस्त हायस्कूलने हे प्रदर्शन यशस्वी केले. त्याबद्दल त्यांचे खरंच मनापासून मी कौतुक करत आहे. निश्चितपणे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातून नवीन संशोधक आणि शास्त्रज्ञ घडतील अशा स्वरूपाचे काम या विज्ञान प्रदर्शनातून करण्यात आले आहे. अशा शब्दात राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी ऑनलाइन शुभेच्छा दिल्या. सावंतवाडी तालुकास्तरीय ५१  वे विज्ञान प्रदर्शन कलंबिस्त हायस्कूलमध्ये दोन व तीन डिसेंबर या दोन दिवसीय कालावधीत आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन ऑनलाईन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर दीपक केसरकर मित्र मंडळाचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, गजानन नाटेकर, संस्था अध्यक्ष शिवाजी सावंत, खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन राजेंद्र रेडकर, एकनाथ सोनुर्लीकर, विभाग प्रमुख जीवन लाड, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत पास्ते, संजय पालकर, विनायक सावंत, श्री. संदेश सोनुर्लीकर,  मुख्याध्यापक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र घावरे,  सचिव चंद्रकांत राणे, बाबा राऊळ, वसंत सावंत, शंकर राऊळ, चंद्रकांत राऊळ, लाडजी राऊळ, मुख्याध्यापक अभिषेक जाधव, माजी पंचायत समिती सदस्य रमेश सावंत, विज्ञान मंडळाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग काकतकर, गट शिक्षण अधिकारी कल्पना बोडके, विस्तार अधिकारी दुर्गा साळगावकर, शिक्षण तज्ञ काका मांजरेकर, म. ल. देसाई, एस. एन. सुर्वे, शशिकांत धोंड, सरपंच सुप्रिया राऊळ, अंतोन रोड्रिक्स, सौ. पवार, नंदू गावडे, स्नेहा कुडतरकर, माजी सरपंच बाळू सावंत, प्रल्हाद तावडे, बाळा राजगे, राजेश पास्ते,  सुनील सावंत आधी उपस्थित होते.

यावेळी विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून श्री. पोकळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोकळे यांनी कलंबिस्त भागात दर्जेदार असे विज्ञान प्रदर्शन होत आहे. येथील व्यवस्था तसेच जी रचना करण्यात आली ती खरोखरच उत्तम आहे. मोठ्या शहरातील शाळांच्या दर्जाला साजेल असे हे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन ग्रामीण भागातील एका शाळेने उत्तमरीत्या भरवले याचे खरंच कौतुक आहे. अशा शब्दात स्तुती केली.

यावेळी प्रास्ताविक रामचंद्र घावरे यांनी केले तर सूत्रसंचालन किशोर वालावलकर, आभार मुख्याध्यापक अभिषेक जाधव यांनी मानले. यावेळी तालुक्यातील बहुसंख्य शाळांनी प्रदर्शनात आपले प्रदर्शन मानले होते. याच विज्ञान प्रदर्शनामध्ये वकृत्व निबंध प्रश्नमंजुषा तसेच विविध स्पर्धाही घेण्यात आल्या त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या विज्ञान प्रदर्शनामध्ये चंद्रयान थ्री आणि अंतराळवीळ चंद्रावर पोहोचले असे सेल्फी पॉइंट आकर्षण ठरले. यावेळी मोठ्या संख्येने पालक विद्यार्थी शिक्षक यांनी सहभाग दर्शवला.