Home स्टोरी कलंबिस्त येथील श्री सावंत माऊली मंदिर पुन प्राण प्रतिष्ठापना भक्तिमय वातावरणात संपन्न.

कलंबिस्त येथील श्री सावंत माऊली मंदिर पुन प्राण प्रतिष्ठापना भक्तिमय वातावरणात संपन्न.

207

सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त येथील श्री सावंत माऊली मंदिर पुन प्राण प्रतिष्ठापना भक्तिमय वातावरणात करण्यात आली. ६ मे ते ८ वेळा तीन दिवसात कालावधीत अध्यात्मिक वातावरणात श्री सावंत माऊली मंदिर कार्यक्रम करण्यात आला. होम हवन, माऊली मूर्ती पूजन, मंदिराला कलशारोहण करण्यात आले. गुरुवारी सकाळी आठ वाजल्यापासून गावातील सावंत समाज, सुहासिनीनी भक्तीमय वातावरणात संपूर्ण मंदिर परिसरात श्री माऊलीच्या जय जय घोषानेपरिसर भक्तिमय केला होता. त्यानंतर श्री लिंगेश्वर मंदिरात फुगडी आधी कार्यक्रमाचे करण्यात आले.

दुपारी अकरा वाजता सुरू झालेला श्री सावंत माऊली मंदिर पुन प्राणप्रतिष्ठापना सोहळा धार्मिक वातावरणात तब्बल दोन तास चालला. यावेळी गावचे प्रमुख मानकरी, देवकर रमेश सावंत यांनी विधिवत अध्यात्मिक सोहळ्यात मंदिराला कलश चढवला व त्याचे पूजन केले.  तर श्री सावंत माऊली देवस्थान च्या मूर्ती पाषाणाचे विधिवत पूजन करण्यात आले यावेळी अभिषेक करून नवीन पाषाण मूर्ती मंदिरात बसवण्यात आली. यावेळी श्रीदेवी माऊली चा जयजयकार करण्यात आली. दुपारी महाआरती करण्यात आली. त्यानंतर महाप्रसाद व सायंकाळी तीन ते रात्री दहा वाजेपर्यंत सुवासिनी ओटी भरणे, कार्यक्रम करण्यात आले. यासाठी मोठी गर्दी झाली होती दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. कलंबिस्त ग्रामदैवत श्री लिंगेश्वर मंदिराच्या समोरच हे छोटे श्री सावंत माऊली मंदिर उभारण्यात आले आहे. येत्या काळात या पंचक्रोशीत या गावातील सर्व मंदिरे आध्यात्मिक पर्यटनाची जोड देणारी असणार आहेत. असे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. गेले तीन दिवस गावात या सोहळ्याने वातावरण भक्तीमय रसात दंग होऊन गेले होते. सर्वत्र वाड्यामध्ये श्री माऊलीचा जयजयकार करण्यात येत होता. गेल्या आठ दिवस या गावात धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम व मंदिर सोहळे सुरू आहेत त्यामुळे गावात अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे. श्री सावंत माऊली मंदिर उभारणीसाठी सावंत समाज ग्रामस्थांचे सहकार्य लाभले यावेळी मोठ्या संख्येने गावातील प्रमुख मानकरी ग्रामस्थ नागरिक नातेवाईक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.