Home स्टोरी कलंबिस्त येथील श्री देवी सावंत माऊली मंदिर पुन प्राणप्रति स्थापनेनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन.

कलंबिस्त येथील श्री देवी सावंत माऊली मंदिर पुन प्राणप्रति स्थापनेनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन.

149

सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त येथील श्री देवी सावंत माऊली मंदिर पुन प्राणप्रति स्थापना विधी कार्यक्रम. मंगळवार ६ ते गुरुवार ८ अशा तीन दिवशी आयोजित करण्यात आला आहे. कलंबिस्त येथील सावंत समाज यांच्या वतीनेहे मंदिर उभारण्यात आले आहे छोटे असलेले हे मंदि र कलंबिस्त गावची ग्रामदैवत श्री लिंगेश्वर देवस्थान मंदिराच्या समोरच हे छोटेखानी मंदिर उभारण्यात आले आहे पूर्वी या ठिकाणी श्रीदेवी सावंत माऊली ची मूर्ती होती. आता या मूर्तीचे मंदिरामध्ये पुन प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. यासाठी मंदिर ची रंगरंगोटी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ६ मे मंगळवारी सकाळी मंदिरात देव आणणे, गणेश वंदन, देवाला नारळ ठेवणे, प्राचित्त घेणे, पुण्य वाचन, आचार्य पूजा, पाकार शुद्धी, श्री देव लिंगेश्वर मंदिरात जनकल्याण लघुरुद्र अनुष्ठान, देवी माऊली तत्व होम, दुपारी एक वाजता महाआरती आणि महाप्रसाद. तर बुधवारी ७ मे रोजी यजमान, गणेश पूजा, पुण्या हवाचन, मूर्ती जलाधीवास, दुपारी एक वाजता महाआरती आणि महाप्रसाद, गुरुवारी आठ मे रोजी प्रमुख विधी सोहळा. पुण्या हवाचन. पाकरशुद्धी, ग्रहदेवता स्थापन, ग्रहयज्ञ, वास्तु स्थापना मूर्ती स्थापना अभिषेक दुपारी एक वाजता महाआरती आणि महाप्रसाद, दर्शन सोहळा तर सायंकाळी सात वाजता स्थानिक ग्रामस्थांचे भजन, रात्री नऊ वाजता श्री यक्षणी दशावतार नाट्य मंडळ माणगाव यांचा मित्रप्रेम दूर्वा सभोजन, हे दशावतार नाटक होणार आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन कलंबिस्त सावंत समाज ग्रामस्थ व आप्तेष्ट यांनी केले आहे.