सावंतवाडी प्रतिनिधी: २१ जून आज सर्वत्र योगा दिन साजरा करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये तसेच कॉलेज महाविद्यालय, न्यायालय, संस्था, नगरपालिका आधी सर्व ठिकाणी सकाळी योगा व प्राणायाम ने दिवसाची सुरुवात करण्यात आली. कलंबिस्त येथील माध्यमिक हायस्कूलमध्ये मैदानावर योगा दिन साजरा करण्यात आला.
यावेळी शेकडून मुले या सहभागी झाली होती मुलांनी प्राणायाम योगा सूर्यनमस्कार आधी सादर केले. सावंतवाडी तालुका बार असोसिएशन तर्फे सावंतवाडी न्यायालयात सर्व वकील व कर्मचाऱ्यांनी योगा दिन साजरा केला. सर्वत्र आज योगाचा प्रसार आणि प्रचार करण्यात येत होता.