सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त राई वाडी येथील इमारत ही देवस्थान जमिनीमध्येच उभारण्यात आली आहे. या इमारतीत श्रीदेवी लिंगेश्वर वहिवाटदर पलटदार गावकर यांच्या मालकीचे आहे. असे असताना सदरची इमारत ही ग्रामपंचायत नावे चढवून तात्कालीन ग्रामपंचायत बॉडीच्या संगनमताने त्या इमारतीचे असेसमेंट चढवण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. या इमारतीवर ग्रामपंचायत मधून आर्थिक व्यवहार झाला असावा. सदर इमारती बाबत आमच्या विरोधात ज्यांनी तक्रार दिली आहे ते अशोक राऊळ यांची सखोल चौकशी करण्यात यावी व त्यांच्यावर फौजदारी कार्यवाही करण्यात यावी. अशा मागणीचे निवेदन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी यांना कलंबिस्त गावातील ग्रामस्थ देवस्थानातील प्रमुख व्यक्तींनी आपल्या सहीच्या निवेदनाद्वारे केली आहे.
या दिलेल्या निवेदनात अनिल रामा सावंत, रमेश विष्णू सावंत, सोमा विष्णू सावंत, अनिल हरिश्चंद्र सावंत, निळकंठ सावंत, चंद्रकांत सावंत, रामचंद्र सावंत, वामन सावंत, गजानन सावंत, यशवंत सावंत, दाजी देसाई आदी ग्रामस्थांच्या सह्य आहेत.
या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिलेल्या ग्रामपंचायत च्या नावे इमारत लावण्यात आली. सदर इमारतीची जमीन ही देवस्थान च्या नावे आहे. या इमारतीमध्ये या गावातील देवस्थानच्या वार्षिक उत्सवा वेळी जेवण करण्यासाठी व इतर सामान ठेवण्यासाठी सदरच्या जागेचा वापर पूर्वपर गावकरी मंडळी कडून केला जात होता. मात्र अलीकडेच आमच्या काही निदर्शनास आले की सदरची ही इमारत परस्पर आर्थिक गैरव्यवहार करून ती इमारत ग्रामपंचायतच्या नावे लावण्याचा प्रकार केला गेला आहे. सदरची देवस्थान च्या नावे जमीन असलेल्या जागेत इमारत आहे. ती इमारत वरील ग्रामपंचायत नावे असेसमेंट उतारा कमी करून देवस्थान जमिनीवर असलेल्या आणि आम्ही गावकरी ग्रामस्थांनी उभारलेली ही आमची इमारत आहे. त्यामुळे सदर इमारतीचा ताबा व असेसमेंट व सदर इमारत परस्पर असिस्टमेंट उताऱ्यावर कोणी लावली? याची सखोल चौकशी करून त्याच्यावर फौजदारी कार्यवाही करण्यात यावी.