सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त गावच्या तंटामुक्ती समितीचे अध्यक्षपदी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे युवकच विभागीय अध्यक्ष दिनेश सावंत यांची दुसऱ्यांदा फेरनिवड करण्यात आली आहे. काल. मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या ग्रामसभेच्या बैठकीत महात्मा गांधी तंटामुक्त अभियान अंतर्गत तंटामुक्त समिती नियुक्त करण्याबाबत चर्चा झाली. यावेळी अध्यक्षपदी दिनेश सावंत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली व समिती ही गठीत करण्यात आली आहे.
betebet
गेल्या वर्षभरात तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष म्हणून गावातील विविध समस्या अडचणी सुटवण्याच्या दृष्टीने श्री सावंत यांनी चांगले काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी युवा वर्ग राहिल्याने पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. या निवडीबद्दल सरपंच सपना सावंत, उपसरपंच सुरेश पास्ते आदींनी अभिनंदन केले आहे.
यावेळी माजी सैनिक प्रकाश सावंत अशोक राउळ, बाबी पास्ते, अनिल सावंत, बाबा पास्ते आधी उपस्थित होते. या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. निवडीबद्दल बोलताना श्री सावंत म्हणाले सैनिकी परंपरा असलेला हा गाव आहे. या गावात शांतता व कायदा सुव्यवस्था राखली जावी, एकोपा एक संघपणा कायम टिकावा व गाव तंटामुक्त व्हावा यासाठी आपले प्रयत्न आहेत. आपण त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. माझ्यावर पुन्हा एकदा जबाबदारी सर्व गाव आणि माझ्या तरुण वर्गाने मला दिली. माझ्यासारख्या तरुणावर हा जो विश्वास टाकला आहे. तो निश्चित आपण सार्थकी लावू.







