Home स्टोरी कलंबिस्त गणशेळवाडी येथील “श्री देव धावगिरेश्वर” देवस्थान जवळ आज सायंकाळी पाच वाजता...

कलंबिस्त गणशेळवाडी येथील “श्री देव धावगिरेश्वर” देवस्थान जवळ आज सायंकाळी पाच वाजता विधिवत होळी करण्यात आली.

235

सावंतवाडी प्रतिनिधी: कोकणातील होळी सण आज पासून सुरू झाला आहे.गावागावात वाड्या वाड्यात होळी साजरी केली जाते. कोकणातील ग्रामीण भागात आणि विशेषता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात सह्याद्री पट्ट्यात आंब्याच्या झाडाची होळी पूजन केले जाते. ही प्रथा आहे.

कलंबिस्त गणशेळवाडी येथील श्री देव धावगिरेश्वर देवस्थान जवळ आज सायंकाळी पाच वाजता विधिवत होळी करण्यात आली. या देवस्थानकडे गावातील शेकडो भक्तगण आपले नवस फेडण्यासाठी येतात.नवसाला पावणारे हे देवस्थान म्हणून या देवस्थानाची ख्याती आहे. गावातील माहेरवासिनी तसेच आजूबाजूच्या गावातील सांगेली सावरवाड आदी भागातून भाविक येथे येतात. होळी सणात पारंपारिक पद्धतीने येते वर्षातून एकदा उत्सव होतो. यावेळी अनेक भक्त आपल्या अडीअडचणी समस्या तसेच साकडे देवाकडे मांडतात आणि ते वर्षभरात भक्तांच्या अपेक्षा पूर्ण होतात त्यामुळे दरवर्षी होळी सणात आपला नवस फेडण्यासाठी अनेक सुवासिनी आणि विशेषता पुरुष मंडळी येथे हजेरी लावतात. विशेष करून या देवस्थानकडे पाच नारळाचे तोरण तसेच पेढे हे विशेष या देवाला भक्तगण वाहत आहेत होळी सणात गावातील पहिली होळी श्रीदेव धावगिरेश्वर येथे साजरी केली जाते. पर्यावरण पूरक आणि पर्यावरण संतुलन राखण्याच्या दृष्टीने हे देवस्थान अत्यंत निसर्गरम्य असे देखणे आहे. अजूनही धावगिरेश्वराची राय म्हणून या देवस्थानाकडे पाहिले जात आहे गणशेळवाडीतील बाल गोपाळ हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात गुण्यागोविंदाने होळी सण येथे साजरा केला जातो.

जय श्री शिवशंकर व जय श्री देव धावगिरीश्वर चा जय घोष ही करण्यात आला. विशेष म्हणजे यंदा या देवस्थानकडे गावाचे पर्यावरण संतुलन राखण्याच्या दृष्टीने व निसर्ग संपत्ती राखण्याच्या दृष्टीने व गावच्या विकासाला हानी पोहोचणारे व पर्यावरणाला मारक ठरणारे असे प्रकल्प देवा हद्दपार कर शेतकरी राजाला बळ दे असे गाऱ्हाणे घालण्यात आले मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते. होळी साजरी केल्यानंतर गावची प्रमुख होळी उत्सवाला सर्व भक्तगण जातात. गावची चव्हाट येथे होळी उत्सव मोठ्या उत्साहातही साजरा करण्यात येतो. नऊ दिवस पारंपरिक पद्धतीने होळी सण साजरा केला जातो