Home स्टोरी कलंबिस्त इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न…!

कलंबिस्त इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न…!

507

सावंतवाडी प्रतिनिधी: “संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी शाळा शाळांमध्ये सहशालेय व सांस्कृतिक उपक्रम राबविणे गरजेचे आहे “असे उद्गार कलंबिस्त इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळ्याचे उद्घाटक सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमित गोते यांनी काढले. या कार्यक्रम प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, सावंतवाडी पंचायत समिती माजी सभापती व सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक रविंद्र मडगावकर, ससंस्थाध्यक्ष शिवाजीराव सावंत, सचिव चंद्रकांत राणे, सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शाळा संस्था सचिव व ज्येष्ठ शिक्षण सल्लागार काका मांजरेकर, माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटना कोल्हापूर विभाग उपाध्यक्ष गजानन नानचे, वुमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर स्टडीज सावंतवाडीच्या प्राचार्या मेघना माळकर, कलंबिस्त सरपंच सपना सावंत, वेर्ले सरपंच रुचिता राऊळ, सावरवाड सरपंच देवयानी पवार, संस्था संचालक शशिकांत धोंड,वसंत सावंत शंकर राऊळ, कलंबिस्त उपसरपंच सुरेश पास्ते , सदस्य विद्या तावडे,,पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष गजानन पास्ते,पालक सदस्य व वेर्ले माजी सरपंच सुभाष राऊळ, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष सूर्यकांत राजगे, आजी माजी सैनिक संघटना पदाधिकारी अनंत सावंत आदी उपस्थित होते.

यावेळी प्रशालेतील विविध स्पर्धा व सहशालेय उपक्रमांतील यशस्वी गुणवंत विद्या्र्थयाांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गुणगौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी पोलीस उपनिरीक्षक अमित गोते यांनी कलंबिस्त हायस्कूलच्या उपक्रमशीलतेचे व विद्यार्थांच्या अंगभूत कौशल्याचे कौतुक करीत अशा सहशालेय व सांस्कृतिक उपक्रमांची शाळा शाळांमध्ये आयोजन करणे काळाची गरज आहे असे सांगितले.त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी कलंबिस्त सारख्या ग्रामीण भागात असणारे कलंबिस्त हायस्कूल नेत्रदीपक प्रगती करीत आहे याबद्दल संस्था व शाळा प्रशासन यांचे कौतुक केले व स्नेहसंमेलनासाठी आर्थिक सहयोग देत शुभेच्छा दिल्या.जिल्हा बॅंक संचालक रविंद्र मडगावकर यांनी प्रशालेच्या कौतुकास्पद कामगिरी बद्दल अभिनंदन करुन कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.यावेळी उपस्थित मान्यवर अतिथींचा संस्था व शाळेमार्फत शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या स्नेहसंमेलन कार्यक्रमासाठी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांनी आर्थिक सहयोग देऊन शुभेच्छा दिल्या. त्याच प्रमाणे सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपअधिक्षक श्रीम.संध्या गावडे यांनीही शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर वालावलकर यांनी तर आभारप्रदर्शन विनिता कविटकर यांनी केले.

यानंतर प्रशालेतील विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम” उधाण २०२४” मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यामधील विविध नृत्य, नाट्य व गायन आविष्कारांनी रसिकांची मने जिंकली. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे विद्यार्थी संकेत जाधव, संचित पालकर, आर्या सावंत,विठ्ठल बिडये यांचे बरोबर निवेदक शुभम धुरी यांनी केले. कार्यक्रमाला पंचक्रोशीतील आजी-माजी सैनिक, पत्रकार, शिक्षण प्रेमी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, आजी माजी विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.