१२ ऑगस्ट वार्ता: निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई यांच्या ‘कर्मा’ चित्रपटातील ‘ए वतन तेरे लिए’ हे गाणे आजही लोकांना देशभक्तीच्या भावनेने भारावून टाकते. देशाच्या स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने या गाण्याच्या संस्कृत आवृत्तीचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. ९ ऑगस्ट २०२३ या दिवशी आयोजित एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या गाण्याच्या संस्कृत आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.या वेळी अभिनेते जॅकी श्रॉफ, सुभाष घई यांच्यासह ‘कर्मा’ चित्रपटाशी संबंधित अनेक लोक उपस्थित होते. संस्कृत भाषेतील हे गाणे कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात संगीतबद्ध करण्यात आले आहे.