१३ मे वार्ता: कर्नाटक राज्यातील काँग्रेस विजयानंतर बोलताना राहुल गांधी यांनी ‘कर्नाटक में नफरत की बाजार बंद हुई है, मोहब्बत की दुकान खुली है’, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी पक्षाच्या विजयावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मी कर्नाटकातील जनतेचे, कर्नाटकातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि पक्षाच्या सर्व नेत्यांचे अभिनंदन करतो. कर्नाटक निवडणुकीत एका बाजूला क्रोनी भांडवलदारांची सत्ता होती, तर दुसऱ्या बाजूला जनतेची सत्ता होती आणि जनतेने त्यांचा पराभव केला. ही लढाई आम्ही प्रेमाने आणि आपुलकीने लढलो. कर्नाटकातील जनतेने आम्हाला सांगितले, या देशावर प्रेम आहे. कर्नाटकात द्वेषाचा बाजार बंद झाला असून प्रेमाचे दुकान उघडले आहे. हा कर्नाटकातील जनतेचा विजय आहे. आम्ही निवडणुकीतील प्रचारादरम्यान पाच आश्वासने दिली आहेत, ती आम्ही पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूर्ण करू, अशी ग्वाही राहुल गांधी यांनी दिली.