Home स्टोरी करुळ घाटात कोसळली दरड…! संरक्षक कठडाही तुटला

करुळ घाटात कोसळली दरड…! संरक्षक कठडाही तुटला

130

घाटातील पडझडीला संबंधित यंत्रणा व ठेकेदार जबाबदार..! स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त.

 

वैभववाडी: करूळ घाटात मोठ्या प्रमाणात दरडीचा ढीग रस्त्यावर कोसळला आहे. डोंगराचा मोठा भाग रस्त्यावर पडल्याने नव्याने बांधलेले संरक्षक कठडे तुटले आहेत. सद्यस्थितीत मात्र या मार्गावरील वाहतूक गेली अनेक महीने बंद आहे.

तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीत करूळ घाटात रस्त्यात दरड कोसळली आहे. कोसळलेल्या दरडी संरक्षक कठड्यावर आदळल्याने कठड्याचा काही भाग दरीत कोसळला आहे. संबंधित यंत्रणेकडून दरडींचा ढीग हटवण्याचे काम सुरू आहे. मात्र संरक्षक कठडे तुटल्याने संबंधित ठेकेदाराच्या निकृष्ट कामांबाबत व यंत्रणेच्या दुर्लक्षाबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

करूळ घाट रस्ता रुंदीकरणामुळे गेले काही महिने बंद आहे. या रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनाकडून करण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्तीने ही घाट मार्गाला मोठा दणका दिला आहे. यापूर्वी संरक्षक भिंत दरीत कोसळली होती. दरम्यान ठेकेदाराच्या निकृष्ट कामांबाबत तसेच संबंधित यंत्रणेने कामाकडे केलेले दुर्लक्ष यावर टिकेची झोड उठवण्यात आली होती. पुन्हा एकदा दरड कोसळून संरक्षक कठडे तुटल्याने घाटमार्गाच्या निकृष्ट कामांबाबत उलटसुलट चर्चा केली जात आहे.