Home राजकारण कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं नाही किंवा त्यांना अटकही करण्यात आलेली नाही.

कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं नाही किंवा त्यांना अटकही करण्यात आलेली नाही.

93

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज सकाळी एक व्हिडीओ शेअर करून दापोलीतून सदानंद कदम यांना अटक केल्याचं म्हटलं होतं. सदानंद कदम हे अनिल परब यांचे सहकारी आहेत. सदानंद कदम यांच्या अटकेच्या बातमीमुळे खळबळ उडाली होती. मात्र, अजूनतरी सदानंद कदम यांना अटक केल्याबाबतची कोणतीही माहिती ईडीकडून देण्यात आली नव्हती. त्यानंतर सदानंद कदम यांची त्यांच्या दापोलीतील कुडेशी गावी जाऊन ईडीने चौकशी केली. चौकशीनंतर कदम यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना अधिक चौकशीसाठी मुंबईला नेत असल्याचं वृत्त समोर आलं होतं. पण हे वृत्तही खरं नसल्याचं समोर आलं आहे. कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं नाही किंवा त्यांना अटकही करण्यात आलेली नाही. कदम यांना ईडीने चौकशीसाठी मुंबईला येण्यास सांगितलं आहे. अशी माहिती मिळत आहे.