Home क्राईम कणकवली हळवल फाटा येथे दगडफेक करत मारहाण…! पोलीसांना देखील मारण्याचा धमकी.

कणकवली हळवल फाटा येथे दगडफेक करत मारहाण…! पोलीसांना देखील मारण्याचा धमकी.

209

कणकवली: येथील हळवल गड नदी फाट्यावर तीन युवकांनी एका ट्रकवर दगडफेक केली. या दगडफेकीत ट्रक मधील एकाच्या डोक्याला दगड बसून गंभीर दुखापत झाली. तर ट्रकच्या काचांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी कणकवली पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार यावेळी त्या ठिकाणी तीन तरुण उभे होते. मात्र ज्यावेळी पोलिसांनी त्या तीन तरुणांना ताब्यात घेतले, त्यावेळी त्यातील तरुणांनी पोलिसांच्या अंगावर जाण्याचा व धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या तिन्ही तरुणांना कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी सहकारी पोलिसांसमवेत तरुणांची धिंड कणकवली पोलीस ठाण्यात आणली. याबाबत त्यांच्याकडे ठोस चौकशी सुरू असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.