Home राजकारण कडाक्याच्या उन्हातही प्रचार करणारे निष्ठावंत शिवसैनिक हीच शिवसेनेची ताकद.

कडाक्याच्या उन्हातही प्रचार करणारे निष्ठावंत शिवसैनिक हीच शिवसेनेची ताकद.

110

सिंधुदुर्ग: शिवसेना- इंडिया- महाविकास आघाडीचे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार श्री. विनायक राऊत यांचा प्रचार करण्यासाठी कार्यकर्ते गावोगावी फिरत आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यात कडाक्याचे ऊन असून अंगाची लाही लाही होत असताना, घामाच्या धारा वाहत असताना देखील कार्यकर्ते याची पर्वा न करता आणि एक रुपयाचीही अपेक्षा न बाळगता मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. सिंधुदुर्गात दहशत निर्माण करणाऱ्यांना या निवडणुकीत कायमचे हद्दपार करून खा. विनायक राऊत यांना पुन्हा एकदा विजयी करण्यासाठी मेहनत घेत आहेत. हेच निष्ठावंत शिवसैनिकांचे शिवसेनेवर आणि उद्धव साहेबांवर असलेले प्रेम आहे आणि निष्ठावंत शिवसैनिक हीच शिवसेनेची ताकद आहे. आमदार वैभव नाईक हे देखील शिवसैनिकांसमवेत प्रचारात उतरून त्यांचे मनोबल वाढवीत आहेत.