Home स्टोरी कट्टा येथे २८ एप्रिल रोजी वधु-वर मेळावा!कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ यांचे...

कट्टा येथे २८ एप्रिल रोजी वधु-वर मेळावा!कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ यांचे आयोजन

49

मसुरे प्रतिनिधी: पंचक्रोशी भंडारी समाज संघ कट्टा, ता- मालवण यांच्या वतीने २८ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९.३० ते सायं. ४ वाजेपर्यंत ओम गणेश साई मंगल हॉल कट्टा येथे वधु-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी एकाच छताखाली वधु-वरांना प्रत्यक्ष पाहण्याची व परिचय करून घेण्याची संधी.नाव नोंदणी पश्चात विवाह जुळेपर्यंत वधु-वर निवडण्यासाठी कायमस्वरुपी नोंदणी रजिस्टर कार्यालयात उपलब्ध असणार आहे.

कार्यक्रम (मेळाव्यात) स्थळी वधु-वरांच्या पालकांना एकमेकांशी बोलणी करण्याची संधी. वधु-वराला स्टेजवर परिचय करून देण्याची मुभा. मेळाव्यात चहा-नाश्ता, जेवणाची व्यवस्था आहे. अधिक माहितीसाठी (९४२२३७९७१०) या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ, कट्टा सर्व समिती सदस्य, पदाधिकारी आणि सर्व समाज बांधव यांनी केले आहे.