मालवण प्रतिनिधी: ररोटरी क्लब माहिम मुंबई यांच्या सहकार्याने बॅ. नाथ पै. सेवांगण कट्टा येथेमधली सुट्टी विद्यार्थी विकास प्रशिक्षण या १० दिवसीय शिबीराचा शुभारंभ व्हरसटाईल एडुकेअर सिस्टिमचे प्रमुख डॉ अजय दरेकर व रोटरीयन रश्मी पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
रोटरीयन रश्मी पाटील यानी या उपक्रमाची माहिती विद्यार्थ्याना दिली. शाळेचा अभ्यास व पुढचे करियर यातील मधला दुवा म्हणून हे प्रशिक्षण महत्वाचे आहे. आपणाकडे भरपूर गुणवत्ता असून ती गुणवत्ता वाढवणे व आपल्या व्यक्तिमत्वातील अनेक पैलूंचा परिचय करून घेणे आवश्यक आहे त्या दृष्टीने हे शिबीर महत्वाचे आहे सर्वांनी १० दिवस नियमीतपणे या शिबीरास उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले.
व्हर्सटाईल एड्युकेअर सिस्टम मुंबईचे प्रमुख डॉ. अजय दरेकर यानी प्रशिक्षण शिबीराचे संपूर्ण नियोजन विद्यार्थ्याना सांगितले हे शिबीर मी व्याखाता व तुम्ही श्रोते अशाप्रकारचे नसून तुमच्या सक्रीय सहभागाने तुमच्यातील व्यक्तिमत्व विकसीत करण्याचे काम आपणास करावयाचे आहे आपण सर्वांनी जिद्दीने परिश्रमाने आनंदाने व शिस्तबद्ध रितीने हे प्रशिक्षण यशस्वी करूया असं त्यांनी सांगितले
दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रशिक्षणाला रोटरी क्लब माहिम मुंबई यानी अर्थसहाय्य केले आहे. वराडकर हायस्कूल कट्टा, माध्यमिक विद्यालय चौके, सौ हि भा वरसकर विद्यामंदिर वराड, न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर या शाळांचे ४४ विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
या सोहळ्यास रोटरीयन रश्मी पाटील, डॉ. अजय दरेकर, सेवांगणचे कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर, कट्टा शाखेचे अध्यक्ष बापू तळावडेकर, कार्यकारिणी सदस्य विद्या चिंदरकर, विश्वस्त दीपक भोगटे, पेंडूर हायस्कूलचे संगम चव्हाण, कट्टा हायस्कुलचे महेश भाट, चौके हायस्कूलचे प्रसाद परुळेकर, मनोज काळसेकर, बाळकृष्ण गोंधळी,व विद्यार्थी उपस्थित होते.