मालवण प्रतिनिधी: बॅ. नाथ पै वाचन मंदिर व केंद्रशाळा कट्टा नं १ यांच्या वतीने कवी कुसुमाग्रज यांची जयंती मराठी भाषा गौरव दिन केंद्र शाळा कट्टा येथे संपन्न झाला. प्रारंभी संपदा भाट यानी गौरव दिनाचे महत्व विषद केले. मुख्याध्यापक ठाकूर सर यांनी अगदी १० व्या शतकापासून मराठी भाषेचा वापर सुरू असून नंतरच्या काळात ज्ञानेश्वर, तुकाराम आदी संतानी या भाषेत अभंग रचना केली. त्यामुळे या वर्षी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लाभला.हे फारच अभिमानास्पद आहे. असे सांगितले.
काळसेकर सर यांनी कविता वाचन केले. प्रारंभी मुलानी लाभले अम्हास भाग्य हे मराठी गौरव गीत सादर केले. इयत्ता ३री च्या मुलानी वासाची किंमत ही छोटी नाट्यछटा सादर केली. साहिल रजपूत विभा मेस्त्री, समर्थ गावडे, स्वराली पाटील, श्लोक वाईरकर, दिया शंकरदास, हार्षिल माळवदे, स्वरा गिरकर, उत्कर्ष बोडये, दुर्वा हुले यानी कथाकथन,काव्यवाचन व धडा वाचन केले.
गुणवंत मुलाना बॅ नाथ पै यांचे छोटे चरित्र व नरेंद्र दाभोळकर यांची पुस्तके भेट देण्यात आली. या कार्यक्रमास बापू तळावडेकर, दीपक भोगटे, काळसेकर सर, मुख्या ठाकूर सर, संपदा भाट व शिक्षकवर्ग ग्रंथपाल जांभवडेकर, श्रीधर गोंधळी व विद्यार्थी उपस्थित होते.