मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): जिल्हा वार्षिक योजना जनसुविधा अतंर्गत केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या शिफारशीनुसार आणि माजी जी प सदस्य श्री संतोष साटविलकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या कट्टा मच्छी मार्केटचा शुभारंभ ज्येष्ठ महिला मच्छी विक्रेत्या श्रीमती सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत वरचीगुरामवाडीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तसेच ग्रामस्थ,सर्व महिला व पुरुष मच्छी विक्रेते उपस्थित होते.