Home स्टोरी कट्टा येथे बॅ नाथ पै पुण्यतिथी विविध उपक्रमानी साजरी! 

कट्टा येथे बॅ नाथ पै पुण्यतिथी विविध उपक्रमानी साजरी! 

17

मालवण प्रतिनिधी: कट्टा सेवांगण येथे बॅ नाथ पै यांची ५४ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या निमित्त ५० शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील ३० स्पर्धातील विजेते ३०० स्पर्धकांचा गुणगौरव प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू देऊन करण्यात आला. प्रारंभी दीपक भोगटे यानी बँ नाथ पै हे कोकणला पडलेले सुंदर स्वप्न होते. त्यांनी १५ वर्षे संसदेत कोकणचे नेतृत्व केले. सर्वांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. नाथ पै म्हणजे संसदेचे भूषण होते असे प्रतिपादन केले.

रश्मी पाटील यांनी मी गेली ४० वर्ष सेवांगण परिवाराशी जोडली गेली असून बापूभाईंमुळे नाथ पैच्या व्यक्तिमत्वाची ओळख मला झाली. पालकानी आपल्या मुलाना नाथ पै यांच्या जीवन चरित्राची ओळख करून द्यावी असेही आवाहन त्यांनी केले. सायली चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष रोटरी क्लब माजी अध्यक्ष उन्मेष सावंत यांनी अशा सुंदर कार्यक्रमास आमंत्रित केल्याबद्दल त सेवांगणास धन्यवाद दिले. व यापुढेही सेवांगणाच्या सर्व उपक्रमास सहकार्य राहिल असे सांगून सर्व मुलांचे अभिनंदन केले. आठवडाभर चाललेल्या सर्व स्पर्धांचे आजच्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन अर्चना धुत्रे, डगरे मॅडम , जांभवडेकर मॅडम व बाळकृष्ण गोंधळी यानी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बाळकृष्ण नांदोसकर व रिया जांभवडेकर यानी केले.१ली ते ४थीच्या ३०० गुणवंताना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास उन्मेष सावंत, रश्मी पाटील, शोभा म्हाडगुत, किशोर शिरोडकर, रमेश म्हाडगुत, शाम पावसकर, बापू तळवडेकर, धुत्रे गुरुजी, गावडे गुरुजी, अर्चना धुत्रे, डगरे मॅडम, दीपक भोगटे, संपदा भाट आदिसह परिसरातील शिक्षक पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.