Home स्टोरी कंटेनर एका हॉटेलमध्ये शिरल्यामुळे पाच जणांचा चिरडून जागीच मृत्यू!

कंटेनर एका हॉटेलमध्ये शिरल्यामुळे पाच जणांचा चिरडून जागीच मृत्यू!

148

४ जुलै वार्ता: धुळे – मुंबई – आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ दुपारी १२ वाजताच्या सुमारास ब्रेक फेल होऊन कंटेनर एका हॉटेलमध्ये शिरल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाला आहे आणि पंधरा ते वीसजण जखमी झाले आहेत. अपघातस्थळी मदतकार्य सुरू आहे. जखमींना तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.