Home स्टोरी औषधांच्या तुतड्याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांची सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला धडक!

औषधांच्या तुतड्याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांची सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला धडक!

91

सिंधुदुर्ग: सामाजिक बांधिलकीच्या वतीने रवी जाधव जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर व युवा रक्तसंघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी आज दिनांक 24 मार्च 2023 रोजी उपजिल्हा रुग्णालयामध्ये जाऊन रुग्णांना देण्यात येणाऱ्या औषधांच्या तुतोड्याबाबत डॉक्टर वज्राटकर यांच्याशी चर्चा केली असता डॉक्टर वज्राटकर यांनी औषधांच्या तुतड्याबाबत मोठी खंत व्यक्त करत म्हणाले पेशंटला बाहेरची औषधे लिहून द्यायला आम्हा डॉक्टर मंडळींना लाज वाटते साधं टि टी च इंजेक्शन सुद्धा बाहेरून लिहून द्याव लागत परंतु आमचा नाईलाज आहे.जिल्हा रुग्णालयाबरोबरच सर्वच उपजिल्हा रुग्णालयांमध्ये शासनाकडून होणारा औषध पुरवठा 80 टक्के कमी आहे याबाबत आम्ही दर आठ दिवसांनी औषधांचा पुरवठा होण्याबाबत पाठपुरावा करत असतो परंतु महाराष्ट्र शासनाकडून पाहिजे तसा औषध पुरवठा होत नसल्याने नाईलाजाने रुग्णांना बाहेरची औषधे लिहून द्यावी लागतात स्टेप्टोगायनेस हे हार्ट अटॅक वरील इंजेक्शन आहे. अशा प्रकारच्या दहा ते बारा इंजेक्शनचा पुरवठा नसल्यामुळे संबंधित रुग्णांना गोवा बांबुळी किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पाठवावे लागते. उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांना डॉक्टर वज्रटकर यांनी विनंती करून याबाबत आपल्याला काय करता येईल. यासाठी सहकार्य करा जेणेकरून गोरगरिबांना त्याचा लाभ मिळू शकेल.

शालेय मंत्री दिपक केसरकर

त्यावेळी देव्या सूर्याजी यांनी माननीय शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर यांच्याशी डॉक्टर वज्राटकर यांचं फोनवर बोलणं करून दिल असता मा. दीपक भाई केसरकर म्हणाले माझं आत्ताच या विषयासंदर्भात कलेक्टरशी बोलणं झालेले आहे. कलेक्टर म्हणाले जेवढी औषधे लागणार त्या निधीसाठी औषधांची लिस्ट आपण सिव्हिल सर्जन कडून मागून घेतलेली आहे. असे कलेक्टर मला म्हणाले परंतु त्यासाठी लागणारा निधी आमदार फंडातून आपण उपलब्ध करून देऊ असे माननीय दीपक भाई केसरकर डॉक्टर वज्राटकर सरांना आश्वासन दिले आहे. त्यासाठी डॉ.वज्राटकर व उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.