औरंगाबाद आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांची नावं बदलून छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव अशी नावं देण्यात आली आहेत. याच नामांतराच्या निर्णयाला छत्रपती संभाजीनगर शहरात नागरिकांकडून मोठा विरोध होत आहे. या निर्णयाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या सात दिवसांपासून साखळी उपोषण सुरु आहे. दरम्यान आज शुक्रवार दि. १० मार्च रोजी शहर बंद ठेवाण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र मुस्लीम अवामी कमिटीतर्फे हा बंदचा निर्णय घेण्यात आला आहे.छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात वेगवेगळी आंदोलने शहरात होत आहेत. याच आंदोलनाचा भाग म्हणून आज औरंगाबाद शहर बंदची ठेवण्यात आलं आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावे बदलल्याच्या निषेधार्थ लोकविकास परिषदेतर्फे आज भडकलगेट ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. दुपारी तीन वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे.