Home स्टोरी ओसरगाव प्रशालेत आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ…!

ओसरगाव प्रशालेत आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ…!

102

मसुरे प्रतिनिधी: समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४९९ शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. यामध्ये मुलींना स्व संरक्षण कसे करावे याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. सदर उपक्रमाचे औचित्य साधून जि. प. पु. प्राथ. शाळा ओसरगाव नं.१ या शाळेमध्ये सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाट्न करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी श्री. प्रदिपकुमार कुडाळकर तसेच जिल्हा शिक्षण विभाग कार्यक्रम समन्वयक श्रीम. स्मिता नलावडे, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.किशोर कदम , बोर्डावे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री सुरेश हरकुळकर ,श्री प्रविण नाईक (शिक्षणप्रेमी) आणि सदर प्रकल्पाचे कोकण विभाग प्रमुख, जिल्हा समन्वयक, जिल्हा प्रशिक्षक समन्वयक, तालुका समन्वयक तसेच श्रीम राजश्री तांबे, श्रीम.शितल दळवी यांनी आभार प्रदर्शन केले प्रमीता तांबे यांनी सूत्रसंचलन केले तसेच जि. प. पू. प्राथ. शाळा कसाल बालमवाडी नं.१ या शाळेतील शिक्षक वर्ग व विद्यार्थी वउपस्थित होते.

मुलींना आत्मरक्षणाचे धडे देणे, प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुलींना संयम कौशल्यात पारंगत करणे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास व जागृती विकसित करणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई ,राज्य प्रकल्प संचालक श्री प्रदीप कुमार डांगे तसेच शिक्षणाधिकारी श्री. प्रदिपकुमार कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.