Home स्टोरी ओवळीयेचा सुपुत्र राहुल सावंत यांची नायब सुभेदार पदी बढती

ओवळीयेचा सुपुत्र राहुल सावंत यांची नायब सुभेदार पदी बढती

180

सावंतवाडी:-ओवळीये गावचा सुपुत्र आणि प्राथमिक शाळा ओवळीये चा माजी विद्यार्थी राहुल सावंत याला भारतीय सैन्यदलात नायब सुभेदार पदी बढती मिळाली आहे.लहानपणापासून देशसेवेची आवड असणाऱ्या राहुल याची २००९ साली सैन्यदलात भरती झाली.*राहुलचे प्राथमिक शिक्षण जि. प.शाळा ओवळीये येथे तर, माध्यमिक शिक्षण युनियन इंग्लिश स्कूल ओवळीये, तर उच्चमाध्यमिक शिक्षण सावंतवाडी आर. पी डी कॉलेज व एस. पी. के कॉलेज मध्ये झाले पदवीपर्यंत च शिक्षण राहुल याने पूर्ण केले . मुळातच अभ्यासात हुशार आणि अभ्यासाची आवड यामुळे राहुल यांनी पदवीचा टप्पा चांगल्या गुणांनी पार केला मात्र राहुलची स्वप्ने इतर मुलांपेक्षा खुप वेगळी होती ध्यानी मनी देशसेवा आणि इतरांपेक्षा काहीतर वेगळं करण्याची जिद्द त्याला स्वस्त बसू देत नव्हती.त्याचे आजोबाही सैन्य दलातून निवृत्त झाले होते. त्यामूळे देशसेवेचा वारसा घरातच मिळालेल्या राहुल ला सैन्य दलात भरती होताना मोठ्या अडचणी आल्या नाहित आणि राहुलचे जे स्वप्न तेच घरच्यांचं असल्याने घरातून मोठा पाठिंबा मिळाला ज्याचे राहुल ने चीज केले आणि सैन्यात भरती झाला.

आज पंधरा वर्षे सेवा बजावल्या नंतर नायब सुभेदार पदास गवसणी घातली. राहुल यांनी आपल्या आतापर्यंतच्या १५वर्षाच्या सेवेत प.बंगाल, जम्मू काश्मीर,पंजाब, येथे देश सेवा बजावली सध्या राहुल सावंत हे पुणे येथे सेवा देत आहेत.त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून मित्र परिवाराकडून गावाकडून राहुल याचा अभिमान वाटत असल्याचे गौरवोद्गार काढले जात आहेत.