Home क्राईम ओरोस येथे मोर्चा काढणाऱ्या ९० जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

ओरोस येथे मोर्चा काढणाऱ्या ९० जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

418

ओरस: काल सोमवार दि. ११ नोव्हेंबर रोजी  जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून ओरोस येथे आम्ही भारतीय च्या नावाखाली काही नागरिकांनी मोर्चा काढला होता. यानंतर आता आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी १३ प्रमुखांसह सुमारे ८० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ओरोस सिडको सर्कल ते पोलीस अधीक्षक कार्यालय, सिंधुदुर्ग या मार्गावर बेकायदेशीर जमाव जमवून मोर्चा काढला होता.  यावेळी जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांनी लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचे तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६८ च्या नोटिशीचे उल्लंघन करण्यात आले. त्यामुळे ८० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील यांच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नं. ६६/२०२५ असा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १८९(२), १९०, १२३ anin महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(२)  व १३५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्ह्यात आरोपी म्हणून संदीप निंबाळकर (रा. सुकळवाड), जयेंद्र परुळेकर (रा. सावंतवाडी), डॉ. सतीश लळीत (रा. ओरोस, खरेवाडी), महेश परुळेकर (रा. कुडाळ), इजाज नाईक (रा. कुडाळ), रफिक मेमन (रा. सावंतवाडी), सर्फराज शेख (रा. कुडाळ), मोहन जाधव (रा. कुडाळ), एजाज मुल्ला (रा. कुडाळ), आसिफ शेख (रा. बांदा), अब्दुल रजाक शेख (रा. बांदा), असलम खेडेकर (रा. साटेली भेडशी, दोडामार्ग) व कमलताई परुळेकर (रा. पंदूर, ता. कुडाळ) यांचा समावेश आहे.