Home राजकारण ओरोस येथे खा. विनायक राऊत यांच्या प्रचार कार्यालयाचे दिमाखात उदघाटन.

ओरोस येथे खा. विनायक राऊत यांच्या प्रचार कार्यालयाचे दिमाखात उदघाटन.

174

खा. विनायक राऊत हॅट्रिक करणार असल्याचा इंडिया आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास

 

सिंधुदुर्ग: इंडिया आघाडीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ ओरोस येथे प्रचार कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. या प्रचार कार्यालयाचे उदघाटन आज खासदार विनायक राऊत व इंडिया आघाडीच्या नेत्यांचे हस्ते दिमाखात पार पडले. एकाच ठिकाणी तिसऱ्यांदा प्रचार कार्यालयाचे उदघाटन करण्यात आल्याने यावेळी निवडणुकीत खा. विनायक राऊत हॅट्रिक करणार असल्याचा विश्वास इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांनी व्यक्त केला.

 

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,‌ जिल्हाप्रमुख संदेश पारकर,काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, उपनेत्या जान्हवी सावंत, सतीश सावंत, अतुल रावराणे, आप जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हाणेकर, विकास सावंत, अर्चना घारे, अमरसेन सावंत, नागेंद्र परब, संग्राम प्रभुगावकर,जयेंद्र परुळेकर, अभय शिरसाट, अनंत पिळणकर, मंदार शिरसाट, सुशांत नाईक, जयभारत पालव, नितीन वाळके, गीतेश राऊत, रुची राऊत, राजन नाईक,हरी खोबरेकर,मिलिंद साटम, मंगेश लोके,जयेश नर, रुपेश राऊळ, बाळू परब, शैलेश भोगले,प्रथमेश सावंत,बबन बोभाटे,मथुरा राऊळ,राजू राठोड, छोटू पारकर,नागेश ओरोसकर, आदींसह इंडिया आघाडीचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.