Home स्पोर्ट ओटवणे येथे भव्य खुल्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन…! प्रथम ५००२४ तर द्वितीय २५०२४...

ओटवणे येथे भव्य खुल्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन…! प्रथम ५००२४ तर द्वितीय २५०२४ रूपये पारितोषिक.

148

सावंतवाडी प्रतिनिधी: ओटवणे चौगुले मित्रमंडळ आणि गावठणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कु ध्रुव बबलू गावकर याच्या वाढदिवसानिमित्त २, ३ आणि ४ फेब्रुवारी रोजी ओटवणे ग्रामपंचायत नजिक भव्य खुल्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५००२४ रुपये व ध्रुव चषक, द्वितीय पारितोषिक २५०२४ रूपये व ध्रुव चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकाना प्रत्येकी ५००० रूपयाचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या १६ संघानाच प्रवेश देण्यात येणार असून इच्छुक संघानी उदीत गांवकर ७८२०८१४३६४ आणि विशाल गांवकर ९४०४९३०२६० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सचिन गांवकर आणि शिवाजी गांवकर यांनी केले आहे.