ओटवणे प्रतिनिधी: ओटवणे येथील रणरागिणी महिला मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या महिला मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मेळाव्यात उपस्थित महिलांना महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने बहुमोल मार्गदर्शन करण्यात आले.
ओटवणे शाळा नंबर १ च्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याच्या व्यासपीठावर वेंगुर्ले पंचायत समितीच्या कृषी अधिकारी शुभदा कविटकर, रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा अश्विनी तावडे, सचिव आशा कविटकर, उपाध्यक्ष दिशा गावकर, बँक ऑफ बडोदाच्या अधिकारी प्रतिमा भैरवकर, माजी उपसरपंच उज्वला बुराण, माजी ग्रामपंचायत सदस्या रत्नमाला गावकर, सोसायटीच्या संचालिका श्रुती गावकर, ज्येष्ठ महिला प्रेमलता मयेकर, वैशाली बोर्ये, अंगणवाडी प्रतिनिधी वर्षा गावकर आदी उपस्थित होत्या.
यावेळी शुभदा कविटकर यांनी महिलांनी स्वतःला कमी न लेखता सर्व क्षेत्रात पुढे येऊन कार्य करावे. तसेच महिला वर्गाच्या हितासाठी आरोग्य व रोजगारबाबत उपक्रम राबवण्यासह शासकीय योजनेचा लाभ महिलांना मिळून द्यावा असे आवाहन करून त्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी प्रतिमा भैरवकर यांनीही महिलांसाठी असलेल्या बँकेच्या कर्ज व इतर योजनांची माहिती दिली. यावेळी इतर उपस्थित महिलांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या संगीत खुर्ची स्पर्धेतील विजेत्या वैशाली बोर्ये, मेणबत्ती पेटवणे स्पर्धेतील विजेत्या स्नेहा जाधव यांना तसेच उत्कृष्ट गायन केलेल्या महिलांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निधी म्हापसेकर तर आभार अश्विनी तावडे यांनी मानले.